esakal | सचिन वाझेला तुरूंगात झोपायला गादी द्या; वकिलाची मागणी

बोलून बातमी शोधा

Sachin-Waze-Bed-Mattress

सुनील मानेच्या कोठडीत वाढ करण्याबाबत कोर्टात सुरू होती सुनावणी

सचिन वाझेला तुरूंगात झोपायला गादी द्या; वकिलाची मागणी
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणाचा तपास NIAकडून केला जात आहे. या प्रकरणी शुक्रवारी मुंबई पोलिस दलातील सुनील माने या पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्यानंतर ही मुंबई पोलिस दलातील तिसरी अटक होती. कोर्टाने वाझे आणि काझीला ५ मे पर्यंत NIA कोठडी सुनावली होती, पण मानेच्या कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे आज मानेला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याची NIA कोठडी १ मे पर्यंत वाढवली. याच सुनावणीदरम्यान, सचिन वाझेच्या वकिलांनी वाझेला तुरूंगात झोपायला गादी देण्याची मागणी केली. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली.

हेही वाचा: अँटेलियाजवळ स्कॉर्पिओ ठेवताना कुठे होता सचिन वाझे, NIAला मिळाली मोठी माहिती

वाझेच्या वकिलांनी नक्की काय केली मागणी?

सचिन वाझेच्या वकिलांनी आज कोर्टात युक्तिवाद करताना वाझे याला पाठदुखीचा ञास असल्याचे सांगितलं. याच आधारावर त्याला तुरूंगात बसण्यासाठी खुर्ची आणि झोपायला गादीची मागणी केली. तसेच वाझेच्या दाताची ट्रिटमेंटची करण्याचीही मागणी त्याच्या वकिलांनी केली. खुर्ची आणि गादीची मागणी कोर्टाने थेट फेटाळूनच लावली. दातावर करण्यात येणाऱ्या ट्रीटमेंटच्या बाबतीत, न्यायालयाने कारागृह नियमानुसार वाझेला वैद्यकिय उपचार मिळतील असे निर्देश दिले.

हेही वाचा: 'खरा सचिन वाझे कोण? एक की दोन महाराष्ट्राला लवकरच कळेल'

NIAने मनसुख प्रकरणात सुनील मानेलादेखील अटक केली होती. त्याच्या पोलिस अधिकारी सुनील मानेला अटक केली. मनसुख हिरेनला हत्येच्या काही काळ आधी जो फोन आला होता, तो फोन तावडे नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने केल्याची माहिती हिरेन यांच्या पत्नीने दिली होती. मात्र, तो फोन तावडे नावाच्या पोलिसाने केला नसून सुनील मानेनेच केला असल्याचा दावा NIA ने केला. तसेच, मनसुखच्या हत्येच्या वेळी माने स्वत: घटनास्थळी हजर असल्याची माहितीदेखील NIA ने कोर्टात दिली आहे, असंही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Sachin Waze Case: मनसुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि रियाझ काझी यांची NIA कोठडी ५ मे पर्यंत वाढवण्यात आली होती. त्या सुनावणी दरम्यान, सचिन वाझेला त्याच्या घरातील सामान म्हणजेच टॉवेल, टूथ ब्रश आणि इतर काही गोष्टी वापरण्याची परवानगी मिळावी असा अर्ज वाझेच्या वकिलांनी कोर्टाकडे केला होता.