मोठी बातमी: इनोव्हा कार कोण चालवत होतं? एनआयएकडून धक्कादायक खुलासा

Sachin_Vaze_Scorpio
Sachin_Vaze_Scorpio

मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळील स्फोटके प्रकरणात मोठा खुलासा  राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेली स्कॉर्पिओ आणि त्यामागे दिसत असलेली इनोव्हा कार कोण चालवत होतं, याबाबत खुलासा करण्यात आला आहे. इनोव्हा गाडी स्वत: सचिन वाझे चालवत होते, तर स्कॉर्पिओ पार्क करणारा वाझे यांचाच एक सहकारी असल्याचं एएनआयने म्हटलं आहे. याप्रकरणी सचिन वाझे यांनीच कबुली दिल्याचं सांगण्यात येतंय. 16 वर्षाच्या निलंबनानंतर सचिन वाझे यांना पुन्हा पोलिस दलाच्या सेवेत रुजू करुन घेण्यात आलं होतं. त्यानंतर आपण पूर्वीसारखेच धडाकेबाज पोलिस अधिकारी आहोत, हे दाखवण्यासाठी वाझे यांनी हा सगळा बनाव रचला असल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवाय या मागे आणखी दुसरं काही कारण आहे का, याचा शोध घेतला जात आहे.  एका मराठी न्यूज चॅनलने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

अँटिलिया निवासस्थानाजवळ एक व्यक्ती पीपीई कीटमध्ये फिरत असल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, तो व्यक्ती पीपीई कीट नाही तर, कुर्ता-पायजम्यामध्ये होता आणि त्याने तोंड झाकले होते, असा खुलासा एनआयएकडून करण्यात आला होता. तसेच हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून सचिन वाझेच असल्याचा संशय एनआयए आहे. याप्रकरणी वाझे यांची अधिक चौकशी सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी रात्री मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात सहभागी संशयीत मर्सिडीज कार राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सीएसटी परिसरातून जप्त केली आहे.  मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओप्रकरणी एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केले होती. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत., तपास सुरु असतानाच NIA ला अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. एनआयए मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणात एका इनोव्हा कारची माहिती समोर आल्यानंतर आता एक मर्सिडिज कार जप्त केली आहे. या कारमधून वाझे हे मनसुख हिरेनला भेटले असून त्यावेळी स्कॉर्पिओ कारच्या चाव्या हिरेनकडून घेतल्या असल्याचा एनआयएला संशय आहे. प्रत्यक्षात ही कार चोरी झालीच नव्हती.

आतापर्यंत गुन्हे शाखेच्या 7 पोलिसांची चौकशी

एनआयएने आत्तापर्यंत गुन्हे शाखेच्या 7 पोलिसांची चौकशी केली आहे. त्यात एक सहाय्यक पोलिस आयुक्त, एक पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक व दोन चालकांचा समावेश आहे. त्यातील पोलिस अधिकारी रियाज काजी यांची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. याप्रकरणी इनोव्हा कार चालवणारा पोलिस अधिकारीच असल्याचा संशय एनआयएला होता. आता इनोव्हा गाडी वाझे चालवत होते, हे समोर आलं आहे. स्कॉर्पिओ कार मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थाजवळ पार्क झाल्यानंतर, इनोव्हा गाडी तेथून निघून गेली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com