जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतात; कोणती ते पहा

Pollution-City-in-India
Pollution-City-in-India

नवी दिल्ली - जगातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरांमध्ये २२ शहरे एकट्या भारतात असून दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे. स्वित्झर्लंडमधील ‘आयक्यू-एअर’ या संस्थेने हवेच्या दर्जाबाबत अहवाल तयार केला असून त्यात हे विश्‍लेषण करण्यात आले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘आयक्यू-एअर’ या संस्थेने तयार केलेल्या अहवालात जगभरातील प्रमुख शहरांमधील हवेच्या प्रदूषणाचा आढावा घेण्यात आला. अहवालानुसार, २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये दिल्लीतील प्रदूषणाचा दर्जा १५ टक्क्यांनी सुधारला आहे. मात्र ही सुधारणा होऊनही जगातील सर्वांत प्रदूषित दहा शहरांमध्ये दिल्लीचे नाव असून ती सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरली आहे. पहिल्या दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर चीनमधील शिनजिआंग हे शहर असून त्यानंतर सलग नऊ क्रमांकावर भारतातील शहरे आहेत. अहवाल तयार करताना १०६ देशांमधील पीएम२.५ कणांच्या हवेतील प्रमाणाबाबतची माहिती गोळा करण्यात आली. लॉकडाउनमुळे जगभरात प्रदूषणात घट झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. 

भारतातील प्रदूषणात वाहनांमधून निघणाऱ्या धुराचा मोठा वाटा असल्याचे अहवालात म्हटले आहे. टाळेबंदीमुळे हवेचा दर्जा सुधारला असला तरी हवा प्रदूषणामुळे आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तितकाच गंभीर असल्याचे पर्यावरण अभ्यासक अविनाश चंचल यांनी सांगितले. सरकारने स्वच्छ ऊर्जेला अधिक प्राधान्य देणे असून विविध ठिकाणी होणारा कार्बनचा वापर कमी करण्यावर भर देणे आवश्‍यक असल्याचे मत चंचल यांनी व्यक्त केले. नागरिकांनी अधिक पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबवावी, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे. 

भारतातील प्रदूषित शहरे
उत्तर प्रदेश : गाझियाबाद, बुलंदशहर, बिसराख जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनौ, मीरत, आग्रा आणि मुझफ्फरनगर
बिहार : मुझफ्फरपूर
हरियाना : फरीदाबाद, जिंद, हिसार, फतेहाबाद, बंधवारी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहताक, धारुहिरा
राजस्थान : भिवडी

भारतातील प्रदूषणामागील कारणे
वाहतूक, स्वयंपाकासाठी जैविक इंधनाचा वापर, वीजनिर्मिती, बांधकाम, उद्योग, कचरा जाळणे आणि काडीकचरा जाळणे

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com