महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा तिच चूक करत आहे : संजय निरुपम

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाबरोबर जाऊन काँग्रेसने चूक केली होती. तेव्हा काँग्रेसने जो मार खाल्ला त्यातून काँग्रेस आजही सावरलेली नाही. महाराष्ट्रात आम्ही हीच चूक करत आहोत.

मुंबई : एकीकडे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार बनविण्याच्या हालचाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुरु असतानाच मुंबईतले काँग्रेस नेते व माजी मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरूपम यांनी मात्र शिवसेनेला आपला असलेला विरोध व्यक्त करणे सुरुच ठेवले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

निरुपम यांनी एक ट्वीट केले असून त्यांनी त्यात पक्ष नेतृत्वाला इशारा दिला आहे. 'काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाबरोबर जाऊन काँग्रेसने चूक केली होती. तेव्हा काँग्रेसने जो मार खाल्ला त्यातून काँग्रेस आजही सावरलेली नाही. महाराष्ट्रात आम्ही हीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाची जागा घेणे म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेस गाडून टाकण्यासारखे आहे. काँग्रेस अध्यक्ष दबावाखाली न येतील तर पक्षाच्या दृष्टीने ते चांगले राहील,' असे निरुपम यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

आता वेळ जवळ आली, आज पवारांना भेटणार : संजय राऊत

दरम्यान, काँग्रेसची आज बैठक होत असून या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात के सी वेणूगोपाल,मल्लिकार्जुन खरगे,विजय वडेट्टीवार,नितीन राऊत,अशोक चव्हाण,नसीम खान बैठकीसाठी दाखल झाले आहेत. काँग्रेस वॉर रूम मध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. 

संजय राऊत म्हणतात, हम बुरे ही ठीक है


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Nirupam advise to Congress in Maharashtra government formation