मिरा-भाईंदरमध्ये चौपाट्या फुल; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

लॉकडाऊनच्या काळातही पर्यटकांची भाऊगर्दी; कायदा धाब्यावर

मिरा रोड : कोरोनाचे संकट टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले असले, तरीही काही अतिउत्साही मंडळी सकाळ- संध्याकाळी वॉक तसेच क्रीडांगणावर एकत्र खेळत असल्याचे धक्कादायक चित्र भाईंदरमध्ये दिसून आले.

धारावीकरांनो सावधान ! आज 'ही' धक्कादायक बातमी आली समोर...

संचारबंदी असतानाही भाईंदर पश्‍चिमेकडील चौपाटीलगत सकाळ-संध्याकाळ वॉकसाठी मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असताना येथील गर्दीत मात्र काही फरक पडल्याचे दिसून येत आहे. मिरा-भाईंदर शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या महाभयंकर साथीमुळे जगभरात हाहाकार माजला असताना या ठिकाणी येणाऱ्या लोकांना मात्र याचे काहीच सोयरसूतक नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांची महत्त्वाचेसरकारकडून प्रोत्साहन भत्ता जाहीर

स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण 
एकीकडे आम्ही या संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून घरी बसायचे आणि काही जण मुद्दाम घराबाहेर पडत असल्याबाबत स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. एरवी तिथे जमणाऱ्या गर्दीचा स्थानिकांना रोजचा त्रास होत असला, तरी सध्या संचारबंदी असताना येथे मोठ्या संख्येने जमाव येतोच कसा, असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आपण रोखणार तरी कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, पालिकेने सर्व उद्याने व क्रीडांगणे बंद ठेवली असली, तरीही अनेक रस्त्यांवर, नाक्‍यांवर सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणाऱ्याची संख्या कमी झालेली नाही. 

महामार्गावरील हॉटेलमालक ठरतोय अन्नदाता

तो सुरक्षारक्षक करतो काय? 
धक्कादायक बाब म्हणजे पालिकेने या ठिकाणी एक कंत्राटी सुरक्षारक्षक तैनात केला आहे, मात्र त्याचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते; तर भाईंदर पश्‍चिमेकडील पोलिस ठाण्याची गाडीदेखील अभावानेच या ठिकाणी येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या ठिकाणी असलेल्या मैदानात हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट खेळण्यासाठी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते.

Seaside full in Mira-Bhayander


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seaside full in Mira-Bhayander