Mumbai News: मुंबईमध्ये येत्या १८ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश; काय आहे कारण?

बुधवारी (२० डिसेंबर) मध्यरात्रीपासून नवीन वर्षातील १८ जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू असणार आहे.
Mumbai News
Mumbai NewsEsakal

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये महिनाभर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, बुधवारी (२० डिसेंबर) मध्यरात्रीपासून नवीन वर्षातील १८ जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू असणार आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून परिपत्रक देखील जारी करण्यात आलेलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात कलम १४४ लागू करण्यात आल्याने ५ किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

जाहीर सभा घेण्यावरही या काळात बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार जमावबंदीच्या कालावधीत शहरात लाऊडस्पीकर, बँड आणि फटाके फोडण्यावर बंदी असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

Mumbai News
Pune Cold : पुणे शहर पुन्हा गारठले; पाषाणमध्ये सर्वांत कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमान

जमावबंदीच्या काळात कोणत्या गोष्टींवर बंदी

  • मुंबईत १८ जानेवारीपर्यंत लाऊड स्पीकर, वाद्ये आणि बँड वाजवण्यास तसेच फटाके फोडण्यास बंदी असणार आहे.

  • कलम १४४ लागू करण्यात आल्याने ५ किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.

  • जमाबंदीच्या काळात सभा तसेच आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

  • यादरम्यान मुंबईत कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

  • न्यायालये, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांभोवती लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई असेल.

  • सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यास बंदी असेल.

  • मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Mumbai News
Latest Marathi News Live Update : हिवाळी अधिवेशन संपताच राज्याचे मंत्री घेणार मनोज जरांगेंची भेट; मराठा आरक्षणाबाबत सरकारला 24 डिसेंबरची 'डेडलाईन'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com