लॉकडाऊनमध्येही चोरीछुपे कपडे विक्री! प्रतिस्पर्धी दुकानदाराने काढला काटा...

दिनेश गोगी
शनिवार, 23 मे 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात चौथा लॉकडाऊन सुरू आहे. या काळात अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. मात्र, या काळातही कपड्याची चोरीछुपे विक्री दुकानात सुरू असल्याची खबर त्याच्या शेजारील दुकानदाराला मिळाली. मग काय...त्याने चक्क लाईव्ह व्हिडीओ बनवून पोलिसांना माहिती देत काटा काढला. उल्हासनगरातील कॅम्प नंबर 4 येथील बाजारपेठेत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालिका व पोलिस अधिकाऱ्यांनी दुकानावर धडक देताना मालकासह ग्राहकांवर गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात चौथा लॉकडाऊन सुरू आहे. या काळात अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. मात्र, या काळातही कपड्याची चोरीछुपे विक्री दुकानात सुरू असल्याची खबर त्याच्या शेजारील दुकानदाराला मिळाली. मग काय...त्याने चक्क लाईव्ह व्हिडीओ बनवून पोलिसांना माहिती देत काटा काढला. उल्हासनगरातील कॅम्प नंबर 4 येथील बाजारपेठेत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालिका व पोलिस अधिकाऱ्यांनी दुकानावर धडक देताना मालकासह ग्राहकांवर गुन्हा दाखल केला आहे.

क्लिक करा : चोरट्याने लुटलं किराणाचं दुकान! कॅडबरी, काजू-बदाम, अगरबत्त्याही पळवल्या

उल्हासनगर महापालिकेने अत्यावश्यक सेवेतील ठराविक दुकानांना उघडण्याची मुभा दिली आहे. त्यात कपडे विक्रीस परवानगी नाही. मात्र कॅम्प नं. 4 मधील जंगल हॉटेलपासून काही अंतरावर असणाऱ्या 'पूजा कलेक्शन' या दुकानाच्या शटरची उघडझाप करून त्याआड चोरीछुपे कपडे विक्री केली जात होती.

प्रतिस्पर्धी दुकानदाराने या प्रकाराचा लाईव्ह व्हिडीओ पोलिस आणि पालिका अधिकारी यांच्याशी कनेक्ट करताच, पालिका आयुक्त समीर उन्हाळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल सोनवणे यांनी दुकानावर धडक दिली.

त्यावेळी बंद शटरच्या आत 6 ग्राहक कपडे खरेदी करताना दिसून आले. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हरेश कृष्णानी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या तक्रारीवरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांनी दुकानदार महेश जीवानी, भारती जीवानी, दीप अवतासिंग यांच्यासह 7 ग्राहकांवर गुन्हा दाखल केला आहे.

क्लिक करा : कोरोना चाचण्यांच्या नावाखाली केडीएमसीचा व्यवसाय

पालिकेची धडक कारवाई
शहरात विविध भागात काही दुकाने सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्त समीर उन्हाळे यांच्याकडे येताच प्रभाग समिती 1 चे सहाय्यक आयुक्त अजय एडके, प्रभाग 2 चे सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत, प्रभाग 3 चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, प्रभाग 4 चे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी सुमारे 10 दुकान मालकांवर कोरोना प्रतिबंधक नियमानुसार कारवाई केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selling clothes in lockdown in Ulhasnagar, police action with the municipality