ज्येष्ठ कर्मचाऱ्यांबाबत वसई-विरार महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

वसई-विरार शहर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी टाळेबंदीतही काम करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी म्हणून महापालिकेचे आयुक्त डी. गंगाधरन यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

वसई : वसई-विरार शहर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी टाळेबंदीतही काम करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी म्हणून महापालिकेचे आयुक्त डी. गंगाधरन यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : एकीकडे कोरोनाची लढाई, दुरीकडे भाजपचे ‘टार्गेट उद्धव ठाकरे’; असं आहे भाजपचं नियोजन

टाळेबंदीपासून रोज स्वच्छता, आरोग्य यासह अन्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत यातील अनेक जण ज्येष्ठ आहेत; परंतु जीवाची पर्वा न करता कोरोनाचा लढा कायम ठेवत आहेत; मात्र यातील 55 वर्षावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास सूट देण्यात आली आहे. तसेच स्वच्छतादूतांना महिन्यातून दहा दिवस रजा देण्यात आली आहे.

मोठी बातमी : कोविडचा सामना करण्यासाठी सरकारकडून जम्बो सुविधा केंद्राचा निर्णय...

तर जे स्थायी व अस्थायी स्वरूपात काम करत आहेत व ज्यांना मधुमेह, हृदयविकार, रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अशांना सवलत देण्यात आली आहे. यातील बरेचशे कर्मचारी महापालिका हद्दीबाहेर राहत असून, त्यांना रोज कामावर न बोलावता दिवसाआड येण्याची मुभा दिली जाणार असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताण कमी होणार आहे. या निर्णयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.

नक्की वाचा : अतिहुशारपणाचा कळस ! सोसायटीत रंगली चक्क 'समोसा' पार्टी, मग पोलिसांनी....

वैद्यकीय प्रमाणपत्र पाहून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूट देण्याचा निर्णय महापालिकेच्या आयुक्तांनी घेतला आहे. अत्यावश्यक सेवेतील वगळून अन्य कर्मचाऱ्यांना सवलत दिली आहे. 
- रमेश मनाले, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका
 

To senior employees not compulsory to come at work, Decision of Vasai-Virar Municipal Corporation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To senior employees not compulsory to come at work, Decision of Vasai-Virar Municipal Corporation