esakal | ज्येष्ठ नाट्यकलावंत लीलाधर कांबळी यांचे दीर्घ आजाराने निधन...
sakal

बोलून बातमी शोधा

leeladhar kambali

लीलाधर कांबळी यांनी वसंत कानेटकर यांच्या 'प्रेमा तुझा रंग कसा' या नाटकापासून बॅक स्टेज आर्टिंस्ट म्हणून रंगभूमीवर काम करण्यात सुरुवात केली. नव्या स्क्रिप्टचं वाचन, बुकिंग क्लार्क, दौऱ्यावर व्यवस्थापन, प्रॉम्पटिंगचं काम करणे अशी काम लीलाधर कांबळी करत होते.

ज्येष्ठ नाट्यकलावंत लीलाधर कांबळी यांचे दीर्घ आजाराने निधन...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : ज्येष्ठ नाट्यकलावंत लीलाधर कांबळी (वय 83) यांचे ठाणे येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. गेले अनेक वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते. गुरुवारी अखेर रात्री 9 वाजता त्यांची प्राण्याज्योत मालवली. राज्य सरकारकडून त्यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कांबळी यांनी अनेक जुन्या नाटकांमध्ये काम केले आहे. त्याच्या पश्तात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.

नियतीची अशीही परीक्षा; आई कस्तुरबा रुग्णालयात तर बाळ ऑपरेशन थिएटरमध्ये...  

लीलाधर कांबळी यांनी वसंत कानेटकर यांच्या 'प्रेमा तुझा रंग कसा' या नाटकापासून बॅक स्टेज आर्टिंस्ट म्हणून रंगभूमीवर काम करण्यात सुरुवात केली. नव्या स्क्रिप्टचं वाचन, बुकिंग क्लार्क, दौऱ्यावर व्यवस्थापन, प्रॉम्पटिंगचं काम करणे अशी काम लीलाधर कांबळी करत होते. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ते नोकरी करत होते. काम करत असातानाच त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली. 'नयन तुझे जादूगर' हे त्यांचे पहिले नाटक होते. यामध्ये कोकण दौऱ्यामध्ये जयंत सावरकर यांच्या जागी त्यांना काम करण्याची संधी मिळाली. 

मुंबई विमानतळाच्या कामात मोठा गैरव्यवहार उघड; जीव्हीकेच्या अध्यक्षासह 'इतके' जण सीबीआयच्या रडारवर...

यानंतर 'काचेचा चंद्र', 'हिमालयाची सावली', 'कस्तुरी मृग', 'दुभंग' या नाटकांमध्ये कांबळी यांनी भूमिका केल्या. त्यांना रंगभूमीवर काम करताना डॉ. श्रीराम लागू यांसारख्या दिग्गज कलाकारांचा सहवास लाभला. त्यानंतर लीलाधर कांबळी यांनी मालवणी रंगभूमीवर काम केले. तेथे मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनने रंगभूमीवर आणलेल्या नाटकात काम केले. 'जिथे फुल उमलते', 'कथा नव्या संसाराची', 'नयन तुझे जादूगार', 'सगळे मेले सारखेच', 'विमानहरण', 'चला घेतला खांद्यावर', 'शहाण्यांनी खावं बसून', 'हसवा फसवी', 'वस्त्रहरण, लफडं सोवळ्यातलं', 'चंपू खानावळीण' (मालवणी) ही त्यांची उल्लेखनीय नाटक आहेत. 

मुंबईत ऑरेंन्ज अलर्टचा इशारा! दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

'केला तुका नि झाला माका', 'वात्रट मेले', 'चाळगती', 'मालवणी सौभद्र', 'तुझ्यात नि माझ्यात', 'सगळे मेले सारखेच' या नाटकांचे कांबळी यांनी स्वतः दिग्दर्शन केले. 'फनी थिंग कॉल्ड लव्ह' या भरत दाभोळकर यांच्या इंग्रजी नाटकातही त्यांनी काम केले.  त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. 'सिंहासन', 'हल्लागुल्ला', 'रंगत संगत', 'आई पाहिजे', 'सारेच सज्जन', 'जिगर', 'बरखा सातारकर', 'प्राण जाये पर शान न जाय', 'श्वास', 'बीज' (हिंदी), 'सविता बानो', 'हंगामा', 'वन रूम किचन', 'सुकन्या' या चित्रपटात अभिनय केला आहे.