
मुंबई, ता. 12 : मुंबईत कोरोना ने थैमान घातले असून रुग्णांची संख्या 15 हजाराच्या जवळ पोचली आहे. असे असले तरी या आजारातून बरे होण्याची संख्या देखील वाढते आहे. पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातून आतापार्यंत हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोना आजरावर उपचार करणारे अंधेरी मरोळ येथील पालिकेचे सेव्हन हिल्स हे सर्वात मोठे आणि महत्वाचे रुग्णालय ठरले आहे. करोना उपचारात अत्यंत मोलाची भूमिका सेव्हन हिल्स रुग्णालयाने बजावली आहे. याच रुग्णालयातून आज 1000 वा रूग्ण करोनावर मात करून घरी गेला. 1 एप्रिल रोजी पहिला करोना बाधीत रूग्ण या रूग्णालयात दाखल झाला होता. आजपर्यंत 1006 रूग्ण या रुग्णालयातून ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. घरी जाताना या रूग्णांना टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात ही आला. घरी जाताना या रूग्णांनी रूग्णालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
करोना रूग्णांवर उपचार करणारे हे मुंबईतील सर्वात मोठे रूग्णालय असून या रुग्णालयात सर्वाधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. या रूग्णालयात तब्बल 898 खाटा आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णालयातील बेडची क्षमता वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या महिना अखेरीस येथील खाटांची क्षमता 1300 पर्यंत नेण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण बरे होत आहेत. मुंबईत आज तब्बल 203 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. कोरोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत 3313 रुग्ण बरे घरी गेले आहेत. यामुळे या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला असून रुग्णांमधील भीती देखील कमी होण्यास मदत मिळत आहे.
seven hills hospital of mumbai is now corona free 1000 patients recovered from hospital
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.