विक्रमगडमध्ये 750 जोडपी अडकली विवाह बंधनात; शर्मिला ठाकरेंनी केले कन्यादान

Community wedding ceremony
Community wedding ceremonysakal media

विक्रमगड : आदिवासी तसेच गरीब शेतकऱ्यांच्या मूला- मुलींचे विवाह लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुढाकार घेत विक्रमगड येथे रविवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे (community wedding ceremony) आयोजन करण्यात आले होते. यावेळी 750 पेक्षा अधिक जोडप्यांना लग्नाच्या बेडीत अडकवून भावी जिवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हे आयोजन विक्रमगड (vikramgad) ग्रामीण रूग्णालयाजवळील सूरकर मैदानात करण्यात आले होते.

Community wedding ceremony
अलिबाग : डंपिग ग्राऊंड , कचरा मुक्तीसाठी रायगड जिल्हा परिषदेचा पुढाकार

कोरोना काळात अनेकांचे विवाह ठप्प झाले असून थाटामाटात लग्नासाठी आर्थिक भुर्दंड सोसण्याची ताकत आता गरिबांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. मनसेच्या वतीने अशातच आयोजित करण्यात आलेल्या लग्न सोहळ्याने आदिवासी कुटुंबाना हातभार लागणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. मंडप, प्रवेशद्वार, मंत्र, सजावट अशा अतिशय शाही पद्धतीने संपन्न झालेल्या या सोहळ्याचे सर्वांनीच कौतुक केले.

या भव्य सामूहिक विवाह सोहळ्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धर्मपत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभाशीर्वाद दिले. शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते अभिजीत पानसे, आमदार राजू पाटील यांनी देखील उपस्थिती लावली. साडे सातशे पेक्षा जास्त नवदांपत्यांना या वेळी जीवनावश्यक साहित्याचे वाटप देखील मनसेतर्फे करण्यात आल. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी एका नवदाम्पत्याला कन्यादान केले. तसेच जव्हार,मोखाडा,विक्रमगड या ग्रामीण भागात रोजगाराची कमतरता असल्याने लग्न आम्ही करून देऊ मात्र सरकारने येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असा खोचक टोला या वेळी शर्मिला ठाकरे यांनी लगावला.

Community wedding ceremony
IPL: डी. वाय. पाटील स्टेडियम मध्ये रंगणार सामने; यजमान शहर म्हणून नवी मुंबई सज्ज

अशा सामूहिक विवाह सोहळयाने आनेकांच्या खर्चाची बचत होत असून त्याचा उपयोग पुढील संसारासाठी लागणाऱ्या वस्तुंच्या खरेदीसाठी करण्यात येत असल्याची माहिती ह्या सामूहिक विवाह सोहळयात सहभागी झालेल्या जोडप्यांनी दिली. यावेळी वधूंना साडी-चोळी, सोन्याचे मंगळसुत्र व आंदण म्हणून हंडा, कळशी, ताट-वाटी आदी भांडी देण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते मात्र ते हजर न राहिल्याने उपस्थितांचा हिरमोड झाला.

मात्र राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, आमदार राजू पाटील, मनसेचे नेते अभिजित पानसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी, समिर मोरे, मनसेचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील,विध्यार्थी सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, नगराध्यक्ष निलेश पडवले, आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून वधू - वरांना शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com