esakal | एल्गार परिषद : "स्वतंत्र चौकशीनंतरच खरं काय ते समोर येईल" - शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

एल्गार परिषद : "स्वतंत्र चौकशीनंतरच खरं काय ते समोर येईल" - शरद पवार

एल्गार परिषद : "स्वतंत्र चौकशीनंतरच खरं काय ते समोर येईल" - शरद पवार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - एल्गार परिषदेचा तपास करण्याबाबत आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्कालीन राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. तत्कालीन भाजप सरकारने पोलिसांच्या मदतीने आपल्या सत्तेचा आणि पदाचा गैरवापर केला असा आरोप शरद पवार यांनी केलाय. आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची चौकशी SIT मार्फतच व्हावी ही मागणी केली. आज पत्रकार परिषदेपूर्वी शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

मोठी बातमी - उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज

काय म्हणाले शरद पवार:

 • भीमा- कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा संबंध नाही.
 • एल्गार परिषदेत १००हून जास्त संघटना सहभागी झाल्या होत्या.
 • संभाजी भिडे यांच्याकडून भीमा-कोरेगावमध्ये वेगळं वातावरण केल्या जात होतं.
 • भीमा-कोरेगावमध्ये स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांमद्धे कधीच कटुता नव्हती.
 • मोठ्या प्रमाणावर लोक इथे अभिवादनासाठी येतात.
 • एल्गार परिषदेशी संबंध नसलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले
 • सुधीर ढवळे यांनी कविता वाचली म्हणून त्यांच्यावर खटला भरण्यात आला.

मोठी बातमी - शीना बोरा हत्या प्रकरण: माजी पोलिस आयुक्तांचा 'मोठा' गौप्यस्फोट..

 • प्रकरणाशी संबंध नसलेल्या लोकांवर खटले भरण्यात आले.
 • २ वर्षांपासून निर्दोष लोकांना डांबून ठेवण्यात आलंय.
 • तत्कालीन राज्य सरकारने सत्तेचा गैरवापर केला.
 • या प्रकरणात पोलिसांचीसुद्धा चौकशी व्हायला हवी.
 • या प्रकरणात SITमार्फत तपास व्हायलाच हवा.
 • अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला.
 • स्वतंत्र तपासनांतरच खरं काय ते बाहेर येईल.
 • केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये.

मोठी बातमी - तुमच्यावर नजर ठेवणारं खतरनाक 'हे' ऍप गुगलने हटवलं..

शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा एल्गार परिषद प्रकरणात तत्कालीन भाजप सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात स्वतंत्र चौकशीनंतरच खरं काय ते बाहेर येईल असंही शरद पवार यांनी म्हंटल आहे.    

sharad pawar on elgar parishad koregaon bhima case and SIT inquiry