Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad Pawaresakal

16 बंडखोरांचं निलंबन होणार? मुंबईत शरद पवारांच्या घरीच खलबतं

आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुबंईतील सिल्व्हर ओकवर महािकास आघाडीची बैठक पार पडलीये
Published on
Summary

आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुबंईतील सिल्व्हर ओकवर महािकास आघाडीची बैठक पार पडली.

मुंबई - सध्याचे राज्यातील राजकीय वातावरण पाहता अनेक घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडणार का असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर महािकास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. (maharashtra politics)

Ajit Pawar-Sharad Pawar
बंडखोर नेत्यांचा राजमार्ग खडतरच, शिंदेंच्या निर्णयावर राजकीय भवितव्य

सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून बैठाकांचे सत्र सुरु आहे. या बैठकीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही सूचना केल्या असल्याची माहिती मिळत आहे. १६ बंडखोरांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर या बैठकीत खलबतं झाली असून कायदेशीररित्या लढू असं पवारांना स्पष्ट केल्याचे समजते आहे. आज पहाटेपासून तिन्ही पक्षांतील महत्वाच्या नेत्यांनी या बैठकीसाठी सिल्व्हर ओकवर येऊन गेले आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सेनेचे अनिल परब आणि देसाई यांनीही पवारांची भेट घेतली आहे. या नेत्यांमध्ये सव्वातासांची बैठक पार पडली आहे.

दरम्यान, शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सल्ला दिला आहे. हा लढा महाविकास आघाडी कायदेशीर आणि एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. १६ बंडखोरांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर या बैठकीत खलबतं झाली असल्याची माहिती मिळत आहे. या आमदारांविरोधात न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासंदर्भात शरद पवारांकडून सल्ला देण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. आता यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar-Sharad Pawar
शिवसेना फोडलेल्या भुजबळांचा जीव वाचला तो फक्त पद्मसिंह पाटलांमुळे: Shivsena Rebel

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com