शिवसेना फोडलेल्या भुजबळांचा जीव वाचला तो फक्त पद्मसिंह पाटलांमुळे: Shivsena Rebel

chagan bhujbal shivsena padmasinha patil
chagan bhujbal shivsena padmasinha patilesakal

शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath shinde rebel) यांच्या बंडामुळे राज्यभरात वातावरण पेटलं आहे. महाविकास आघाडी विरोधात जवळपास चाळीसहुन अधिक आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटी मध्ये तळ ठोकून आहेत. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शिवसेनेचे मोजकेच आमदार शिल्लक राहिले असल्याच चित्र उभं आहे. दोन्ही बाजुंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकनाथ शिंदे हे स्वतःचा सवतासुभा उभा करतील अशी शक्यता असली तरी शिवसेनेकडून त्यांच्या गटातील आमदारांना समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न सुरु आहे.( (Maharashtra Politics Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray)

शिवसेनेत एवढं मोठं बंड होण्याची ही पहिली वेळ नाही.

खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिवसेना फोडण्याची कामगिरी सर्वप्रथम छगन भुजबळ यांनी करून दाखवली होती. ऐंशीच्या दशकात छगन भुजबळ हे सेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जायचे. त्याकाळात विधानसभेत सेनेचे ते एकमेव आमदार होते मात्र तरीही विरोधी बाकांवरून भुजबळांनी शिवसेनेची भूमिका कणखरपणे बजावली आणि तत्कालीन काँग्रेस सरकारला सळो की पळो करून सोडले.(Chagan Bhujbal shivsena rebel)

तो काळ मंडल आयोगाच्या आंदोलनाचा होता. ओबीसी आरक्षणावर बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या काही भूमिकांमुळे छगन भुजबळ शिवसेनेवर नाराज होत गेले. असं म्हणतात की एका आर्ट गॅलरीच्या उद्घाटन सोहळ्यात काँग्रेसचे नेते रामराव आदिक यांना बाळासाहेब म्हणाले, 'आमच्याकडचा कचरा तुम्ही घेऊन जा.' हे वाक्य भुजबळांना उद्देशून असल्याची चर्चा झाली. भुजबळांच्या मनात चलबिचल सुरू झाली.

यातूनच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते असणाऱ्या शरद पवार (sharad pawar )यांच्याशी त्यांचं जवळकीच नातं निर्माण झालं. भुजबळांच्या नाराजीला पवारांनी बळ दिलं. खरा ड्रामा झाला १९९१ सालच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात. ऐन अधिवेशनात छगन भुजबळांनी शिवसेनेच्या १८ आमदारांसह बंड केलं.

chagan bhujbal shivsena padmasinha patil
Shivsena Rebel: भुजबळांनी पक्ष सोडू नये म्हणून बाळासाहेबांनी कोणते प्रयत्न केले होते?

शिवसेनेत यापूर्वी बंड हा शब्द देखील उच्चारणे गुन्हा होता. छगन भुजबळांना गद्दार म्हणून घोषित करण्यात आलं. कित्येक शिवसैनिक त्यांच्या जीवावर उठले. शरद पवारांना असे होणार ठाऊक होते. त्यांनी भुजबळांच्या संरक्षणाची आधीच व्यवस्था केली होती. उस्मानाबादचे आमदार पद्मसिंह पाटील हे त्यांचे जवळचे सहकारी व नातेवाईक होते. त्यांचा दरारा खूप मोठा होता. सुरवातीला नागपूरच्या पॉवर हाऊस मध्ये आणि नंतर पद्मसिंह पाटील यांच्या घरात भुजबळांना लपवण्यात आलं. (Padmasinha patil usmanabad)

पद्मसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांची घराबाहेर गस्त होती. भुजबळांना हात देखील लावण्याची कोणाची हिंमत झाली नाही.

मात्र दुसऱ्या बाजूला बाकीच्या आमदारांनी मात्र ऐनवेळी कच खाल्ली. बाळासाहेबांच्या क्रोधाला घाबरून १८ पैकी १२ आमदार शिवसेनेत परतले. भुजबळांनी मात्र आपलं बंड मागे घेतलं नाही. ते खुले आम बाळासाहेब ठाकरेंना टी बाळू अशी टीका करत राहिले. शिवसेनाप्रमुखांनी देखील त्यांना लखोबा लोखंडे अशी उपमा दिली होती. छगन भुजबळ काँग्रेसमध्ये गेले आणि मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं. पुढे अनेक दिवस भुजबळांना कमांडो प्रोटेक्शन मध्ये राहावं लागलं हे मात्र खरं.

आजही शिवसेनेतून बंड करणाऱ्या आमदारांच्या घरावर हल्ले होतात तेव्हा छगन भुजबळांनी केलेलं बंड आणि पद्मसिंह पाटलांनी त्यांचा वाचवलेले जीव याची आठवण हमखास सांगितली जाते.

chagan bhujbal shivsena padmasinha patil
Shivsena Rebel: बाळासाहेब म्हणाले, दिघेंना धर्मवीर बनवून ठेवलं आणि ठाण्याची सत्ता गेली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com