Mumbai News : बाप रे बाप' वर्गात घुसला साप; शिक्षक - विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ

कल्याण पश्चिमेतील शशांक विद्यालयातील घटना
Shashank Vidyalaya snake entered in classroom Teachers and students panic mumbai
Shashank Vidyalaya snake entered in classroom Teachers and students panic mumbaiesakal

डोंबिवली - कल्याण पश्चिमेतील शशांक विद्यालयात वर्गात तास सुरु असताना वर्गात अचानक साप आल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांची भीतीने गाळण उडाली. विद्यार्थ्यांच्या गलक्याने विद्यालयात एकच आरडाओरडा झाला. अखेर सर्प मित्रांना बोलावण्यात आले. सर्प मित्रांनी या सापाला पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला.

Shashank Vidyalaya snake entered in classroom Teachers and students panic mumbai
Mumbai News : विमानात धूम्रपान करणाऱ्या आरोपीची न्यायालयाकडून जामीनावर सुटका

कल्याण पश्चिमेतील शशांक विद्यालयात शाळा भरल्यानंतर वर्गात तास सुरु होते. यावेळी विद्यार्थ्याच्या बेंच खाली साप असल्याची गोष्ट शिक्षक व विद्यार्थ्यांच्या लक्षात आली. साप वर्गात असल्याचे समजताच एकच गलका उडाला.

Shashank Vidyalaya snake entered in classroom Teachers and students panic mumbai
Mumbai slum fire : मन होरपळले ,तरी स्वप्न कायम ! पुस्तके जळाली; विद्यार्थ्यांना हवे बळ

विद्यार्थी व शिक्षकाची भीतीने चांगलीच तारांबळ उडाली. पुस्तके आणि स्कूल बॅग सोडून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळेच्या बाहेर धूम ठोकली. शाळेत साप असल्याची माहिती सर्पमित्रांना मिळताच सर्पमित्र दत्ता बॉम्बे यांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांच्या बेंच खाली लपलेल्या सापाला पकडले.

Shashank Vidyalaya snake entered in classroom Teachers and students panic mumbai
Mumbai News : शीतल म्हात्रेंचा पाठलाग केल्याप्रकरणी दोघांवर दादर पोलिसात गुन्ह्याची नोंद; आरोपींचा शोध सुरू

साप पकडल्याचे पाहून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सुटकेचा निश्वास घेतला. दरम्यान शाळेत पकडलेला साप हा बिनविषारी धामण जातीचा असून वन अधिकाऱ्याच्या परवानगीने लगेच त्याला जंगलात सोडले जाणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोबे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com