
मोखाडा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, पालघर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांना गळाला लावत शिंदे शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. निकम यांच्या सोबत 10 माजी जिल्हा परिषद सदस्य, 52 सरपंच, उपसरपंच, 123 ग्रामपंचायत सदस्य यांनी भाजपात प्रवेश केला आहे.