

Dynasty Politics Six Family Members Get Election Tickets from Shinde Led Shiv Sena
Esakal
राजकारणात घराणेशाही काही नवी नाहीय. अनेकदा घराणेशाहीवरून टीकाही केली जाते पण तरीही नेते त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवताना दिसतं. आता बदलापूरमध्ये घराणेशाहीने कळस गाठला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून एकाच घरातल्या तब्बल ६ जणांना उमेदवारी देण्यात आलीय. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा जण मैदानात आहेत.