शिवसेना म्हणते, 'इतना सन्नाटा क्युँ है भाई!'

टीम ई-सकाळ
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून आज, देशातील आर्थिक मंदीवर भाष्य केले आहे. दिवाळीतील शुकशुकाट या शीर्षकाखाली सामनाने अग्रलेख प्रसिद्ध केला आहे. 

मुंबई  : राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी, अद्याप भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. भाजप ठरल्याप्रमाणं सरकार स्थापन होईल, असा दावा करत आहे. तर, शिवसेना भाजपवर दबाव टाकून जास्तीत जास्त खाती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र येणार असले तरी, त्यांच्यात 'ऑल इज वेल' असं म्हटणं धाडसाचं ठरणार आहे.

नवनीत राणांविषयी अपशब्द; रवी राणांनी केली मारहाण

निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली आहे. पण, दिवाळीची उत्साह म्हणावा तसा दिसत नाही. हाच धागा पकडून शिवसेना अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधत आहे. शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून आज, देशातील आर्थिक मंदीवर भाष्य केले आहे. दिवाळीतील शुकशुकाट या शीर्षकाखाली सामनाने अग्रलेख प्रसिद्ध केला आहे.

युतीच्या मनोमीलनानंतर ठरणार आघाडीची रणनिती

काय म्हटले आहे अग्रलेखात?
राज्यात आणि देशात दिवाळीचा उत्साह म्हणावा तसा दिसत नाही. जनता आहे त्या परिस्थितीत दिवाळी साजरी करत आहे. बाजारपेठांमध्ये फारशी उलाढाल नाही. दिवाळीच्या आधी झालेल्या निवडणुकांमध्येही फारशी उलाढाल झाली नाही. तेथेही शुकशुकाटच पहायला मिळाला. त्यामुळे 'इतना सन्नाटा क्यूँ है भाई?' असा प्रश्न शिवसेनेने अग्रलेखात उपस्थित केलाय. या दिवाळीत शेतकऱ्यांचे खूप हाल झाले आहेत. नोव्हेंबर तोंडावर आला तरी राज्यात पाऊस थांबलेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक अनेक ठिकाणी वाया गेले आहे. फळबागांचीही नासाडी झालीय. बाजारपेठांमध्ये 30-40 टक्के खरेदी कमी झाली आहे. आरबीआयकडील पावणे दोन लाख कोटी रुपये काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. रिझर्व्ह बँक आता आपल्याकडील सोने मोडायला निघाली आहे. जनतेचा खिसा रिकामा असून, ऑनलाईन शॉपिंगमधून विदेशातील कंपन्यांकडे पैसा जाऊ लागला आहे. बाजारपेठेतील शुकशुकाट 'इतना सन्नाटा क्यूँ है भाई?' असा प्रश्न विचारत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena targets bjp on economic slowdown udhava thackeray sanjay raut