Ramesh Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे जाधव निवडणूक रिंगणातून बाहेर

रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
Ramesh Jadhav
Ramesh Jadhavesakal

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या सोबतच माजी महापौर रमेश जाधव यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे कल्याण लोकसभेत ठाकरे गटाचा उमेदवार ऐन वेळी बदलणार का याची चर्चा रंगली होती. अखेर सोमवारी पक्ष प्रमुखांनी आदेश दिला आणि जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. जाधव निवडणूक रिंगणातून बाहेर पडल्याने आता वैशाली दरेकर याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Ramesh Jadhav
Pune Crime News : कॉग्निझंट प्रकरण : लाच लुचपत विभागाला न्यायालयाचे समन्स

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होत आहे. महायुती व महाविकास आघाडीतील पक्षांनी शक्तिप्रदर्शन करत आपल्या आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे केडीएमसीचे माजी महापौर रमेश जाधव यांनी निवडणूक कार्यालय गाठत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. वैशाली दरेकर यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Ramesh Jadhav
Jalgaon Banana News : केळीच्या बाजारभावात घसरण सुरूच; अनेक कारणांनी केळी उत्पादकांना बसतोय फटका

त्यामुळे ठाकरे गटाकडून ही नवीन खेळी खेळली आहॆ कां? दरेकर उमेदवार असताना जाधव यांनी अर्ज का दाखल केला ? ठाकरे गट उमेदवार बदलणार का की तोच ठेवणार?, पक्षातील वरिष्ठांना उमेदवारावर विश्वास नाही का ? यावर उलट सुलट चर्चा रंगू लागल्या होत्या. रविवारी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या कल्याण लोकसभेत दोऱ्यावर असताना पक्षप्रमुख सांगतील त्या आदेशाचे आम्ही पालन करू असे सांगत पक्षाची भूमिका अस्पष्ट ठेवली होती. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात जाधव यांचा फोन दुपार पासून स्वीचऑफ येऊ लागल्याने ठाकरे गोटात नक्की काय हालचाली होत आहेत याची उत्सुकता विरोधी पक्षतील गोटातही होती. अखेर दुपारी अडीच वाजता जाधव हे निवडणूक कार्यालयात दाखल झाले. त्यांना पक्षप्रमुखांचा फोन आला व त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि या नाट्यावर पडदा पडला.

त्यामुळे वैशाली दरेकर या शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार असतील.दरम्यान फॉर्म मध्ये त्रुटी राहिली तर उमेदवार बाद होऊ शकतो. त्यामुळे दुसरा फॉर्म सेफ साईड भरला असे सांगण्यात येतं आहॆ. दरेकर यांचा अर्ज वैध होताच जाधव यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे कल्याण मधील ठाकरे गट आपले प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकत असल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com