शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा; श्रेयावरून आरोप-प्रत्यारोप...

समीर सुर्वे
रविवार, 12 जुलै 2020

धारावी पॅटर्नचे श्रेय सरकारचे नाही; तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे आहे. त्यांनी तेथे जीव धोक्यात घालून काम केले, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर हा मढ्यावरील लोणी खाण्याचा प्रकार आहे, असा टोला शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लगावला. 

मुंबई : कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यात यशस्वी ठरलेल्या धारावी पॅटर्नचे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेने केल्यानंतर मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेची दमदार कामगिरी; मुंबई विभागाने केली 'इतक्या' लाख वॅगन्सची मालवाहतूक...

धारावी पॅटर्नचे श्रेय सरकारचे नाही; तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे आहे. त्यांनी तेथे जीव धोक्यात घालून काम केले, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर हा मढ्यावरील लोणी खाण्याचा प्रकार आहे, असा टोला शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लगावला. 

रुग्णवाहिकांकडून लुटमार सुरुच; अवघ्या अडीच किलोमीटरसाठी आकारले तब्बल 'इतके' हजार रुपये...

आशिया खंडातील सर्वात दाट वस्ती असलेल्या धारावीतील कोरोना संक्रमणावर नियंत्रण आणल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने कौतूक केले होते. त्यावर पाटील यांनी याचे श्रेय स्वयंसेवक संघाचे असल्याचे सांगितले. तसेच, कोरोना नियंत्रणात आल्याचा आनंदच आहे; मात्र भ्रष्टाचारावर बोलायचे नाही का?  कोरोना कामाचे अभिनंदन करताना जो भ्रष्टाचार झाला, त्याचेही विषय काढू,  असा टोलाही पाटील यांनी लगावला. त्याला खासदार शेवाळे यांनी उत्तर दिले आहे.

...तर वीजग्राहकांना होऊ शकतो 750 रुपयांचा दंड; वाचा सविस्तर...

सर्वांचे एकत्रित प्रयत्न
धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणी किती मेहनत घेतली, याची साक्ष धारावीतील जनताच देईल. मोठेपणा हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो,  असे प्रतिउत्तर खासदार राहुल शेवाळे यांनी दिले आहे. तसेच, राज्य सरकार, महापालिका, डॉक्टर्स, मुंबई पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि धारावीची जनता यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याचे ते म्हणाले.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena and bjp fires on each other over dharavi pattern