esakal | जाणून घ्या शिवसेना-भाजप मधील सत्तासंघर्षाचा इतिहास..  
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या शिवसेना-भाजप मधील सत्तासंघर्षाचा इतिहास..  

जाणून घ्या शिवसेना-भाजप मधील सत्तासंघर्षाचा इतिहास..  

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील समसमान वाट्यावर शिवसेना अडून बसली आहे तर भाजप काही केल्या मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. समान विचारधारा असणारे हे दोन मोठे पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र शिवसेना भाजप मधील हा सत्ता संघर्ष नवीन नसून या सत्ता संघर्षाला जुने संदर्भ कारणीभूत असल्याचे राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे.

राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला बहुमत दिले.असे असले तरी निकाल लागून दोन आठवडे व्हायला आले तरी सत्तेची गाडी काही रुळावर आलेली नाही. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजप ने ताणून धरलं आहे.निकालाच्या पहिल्या दिवसापासून दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आसूड ओढण्यास सुरुवात केली.याचे पडसाद आता जनमानसात ही उमटायला सुरूवात झाली आहे.शिवसेना-भाजप नेत्यांच्या भांडणामुळे कंटाळलेल्या लोकांनी ही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर आसूड ओढायला सुरुवात केली आहे.मात्र शिवसेना-भाजप मधील सत्ता संघर्षाची ही वेळ काही नवीन नाही.दोन्ही पक्षांमध्ये तणावाची परिस्थिती उद्भवण्याला काही जुने संदर्भ कारणीभूत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

शिवसेनेला बाहेरून पाठींबा देण्याबद्दल वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य..
 

2014 मध्ये सेना-भाजपमध्ये जागावाटपावरून युती तुटली

2014 मध्ये सेना-भाजपमध्ये जागावाटपावरून युती तुटली आणि शिवसेना-भाजपचा पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.सत्तास्थापनेच्या वेळेला शिवसेना विरोधी बाकावर बसली आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची साथ घेत बहुमत सिद्ध करत सत्ता मिळवली.शिवसेनेला सात कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पदावर समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेत सामावून घेतलं.मात्र आता चित्र पालटलं आहे.आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपचा सत्तासंघर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समसमान वाटप यावरून सुरू झाला असला तरी यावेळी शिवसेनेचं पारडं जड असल्याने त्यांनी भाजपची कोंडी केली आहे.

आता कामाचे तास नऊ होणार! 
 

सत्ता वाटपाच्या वेळेस शिवसेना-भाजप मधला संघर्ष

शिवसेना-भाजप मधला संघर्ष प्रत्येक सत्ता वाटपाच्या वेळेस उभा राहतो.याचे मागचे जुने काही संदर्भ आहेत.1995 मध्ये जेव्हा पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आलं, त्यावेळेलाही आपल्या पदरात जास्ती खाती पडावीत आणि महत्त्वाची खाती आपल्याकडे राहावीत म्हणून भाजपचे तत्कालीन दोन महत्त्वाचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे  अडून बसले होते. त्यांनी शरद पवारांना मध्यस्थी करायला लावून बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या मनात असलेला मुख्यमंत्री सुधीर जोशी यांना बदलायला लावलं.मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवायला लावलं. 1995 मध्ये जेव्हा सत्ता आली,त्यावेळेस शरद पवार यांना मध्यस्थी करायला लावून महत्त्वाची सगळी खाती महाजन यांनी भाजप कडे ठेवली.त्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री होतं ,ऊर्जामंत्री ही पद भाजप आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाली होती. भाजपचे आणि महाजनांचे हट्ट त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने पुरवले होते. शिवाजी पार्कवर जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर शपथविधीचा सोहळा पार पडला.

ठाणे रेल्वे पुलाची दुरुस्ती कधी होणार?

शिवसेना भाजप सरकार साडेचार वर्ष महाराष्ट्रात सत्तेत राहिलं. "फील गूड" चा नारा देत चांगले दिवस येतील अस लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला. फीलगुडचा फुगा 1999 मध्ये केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी फुटला.महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 1999 मध्ये जेव्हा भाजप - शिवसेनेला बहुमत मिळालं नाही त्यावेळेस भाजपने बाळासाहेब ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपद भाजपला देण्याचा हट्ट केला होता. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करा,तरच समर्थन देऊ अशी भूमिका भाजपने घेत आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करू अशी धमकी शिवसेनेला दिली होती.यामुळे 1999 मध्ये भाजपच्या या धमकीमुळे शिवसेनेला आपल्या आमदारांसह काही अपक्ष आमदारांची पळवापळवी ही कारावी लागली होती.मात्र भाजपने मुख्यमंत्रीपदाचा हट्ट कायम धरल्याने शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि विलासराव देशमुख काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वात मुख्यमंत्रीपदावर बसले.यामुळे शिवसेना-भाजपला हात चोळत बसावं लागलं.यानंतर सलग 15 वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सरकार राज्यात राहिल्याने शिवसेना-भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं.मात्र दोन्ही पक्षाने जुन्या अनुभवातून धडा घेतल्याचे दिसत नाही. 

WebTitle : shivsena and bjp government formation conflict and its history