"शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची B टीम"

"शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची B टीम"
Updated on

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज 'चले जाओ' मोर्चा काढण्यात येतोय. अशात मोठ्या संख्यने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे मुंबईत दाखल झालेत. अशात CAA आणि NRC समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्या अनेक संघटना देखील या मोर्चात सहभागी होणार असं समजतंय. याचसोबत भाजपचे काही कार्यकर्ते राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा निवडल्यामुळे या  'चले जाओ' मोर्चात सहभागी झाले आहेत. दरम्यान बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध आज निघणाऱ्या मनसेच्या महामोर्चामागे भाजपचा हात असल्याच्या शिवसेनेच्या आरोपाला मनसेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रखर हिंदुत्वाकडे वाटचाल करायला सुरवात केली आहे. अशात काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी फडणवीसांची घेतलेली भेट आणि त्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया पाहता आज निघणाऱ्या 'चले जाओ' मोर्चामागे भाजपचा हात आहे असं शिवसेनेने म्हटलंय. याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रोखठोक उत्तर देण्यात आलं. 'शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याचं हे लक्षण आहे,' असा पलटवार मनसेच्या नेत्यांनी केला आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मराठी वृत्तवाहिनीवर बोलताना मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यावेळी बोलताना मनसेच्या भूमिकेतील हा बदल शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनं केलेली खेळी असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम हिंदुत्ववादी आणि देशाच्या बाजूने भूमिका घेणारी आहे असं मनसे नेत्यांनी सांगितलं. या आधी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांगलादेशी आणि पाकिस्तान्यानविरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आरोपात काहीही तथ्य नाही असं मनसे नेते अनिल शिदोरे म्हणालेत.

शिवसेनाच राष्ट्रवादीची B टीम - 

शिवसेनेकडून मनसेवर भाजप पुरस्कृत मोर्चा काढल्याचे आरोप केले जातायत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केलीये. शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेची B टीम आहे असं संदीप देशपांडे म्हणालेत.   

shivsena call mns rally is bjp sponsored mns call shivsena as b team on NCP  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com