आमदार रविंद्र चव्हाण वैफल्यग्रस्त झालेत; शिवसेनेने सोडले टीकेचे बाण

Shivsena press conference
Shivsena press conferencesakal media

डोंबिवली : देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) सरकारच्या शेवटच्या कालावधीत 471 कोटींच्या विकासकामांचा (Development proposal) प्रस्ताव होता. त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला. मात्र त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे कामाच्या निविदाच निघाल्या नाहीत. ज्या कामांच्या निविदा नाहीत त्यांचे कार्यादेश दिले जात नाही ही तांत्रिक बाब जर 13 वर्षे आमदार असलेल्या लोकप्रतिनिधीला कळत नसेल तर त्यांनी अभ्यास करावा, अशी खोचक टीका शिवसेनेचे युवा पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी भाजप आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांच्यावर केली. आमदार चव्हाण वैफल्यग्रस्त झाल्याने (Eknath shinde) पालकमंत्री शिंदे यांच्यावर टीका करत सुटले आहेत असे विधान ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी म्हणत (Ramesh mhatre) चव्हाण यांच्यावर टीकेचे बाण सोडले.

Shivsena press conference
"यशाच्या उंचीवरून अधोगती होऊ न देता नवे शिखर गाठा"

भाजप सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या प्रमुख 30 रस्त्यांची कामे पालकमंत्री शिंदे यांनी रद्द केली. पालकमंत्री शिंदे डोंबिवलीतील विकासकामांचे मारेकरी असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी मुंबईत केला होता. या आरोपांचे खंडण गुरुवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत केले. कल्याण डोंबिवली महापालिकेत युतीची सत्ता असताना पालकमंत्री शिंदे यांच्या होकाराला भाजप आमदार चव्हाण हे होकार देत होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर डोंबिवलीत भाजप आमदार चव्हाण यांची मोठी अडचण झाली असल्याचे दिसते.

बुधवारी चव्हाणांनी पालकमंत्री शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधत डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असा आरोप त्यांच्यावर केला. त्यासोबतच त्यांनी 30 रस्त्यांची मंजुर झालेली कामे पालकमंत्र्यांनी रद्द केल्याचा आरोप केला आहे. यावर बुधवारी शिवसेनेने पत्रकार परिषद घेत आमदारांच्या आरोपांचे खंडण केले. यावेळी डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, युवा पदाधिकारी दिपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विधानसभा संघटक तात्या माने उपस्थित होते.

Shivsena press conference
अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार ?

देश कोरोनाच्या संकटात असताना महसूली उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या सरकारने आरोग्य सुविधा देण्यासाठी इतर खर्चावर मर्यादा आणली. त्यामुळे ज्या विकास कामांची निविदा प्रक्रीया होऊन कार्यादेश दिले गेले नाहीत ती कामे रद्द केली गेली. मात्र चव्हाण यांनी कार्यादेश निघण्यापूर्वीच कामांचे नारळ फोडले होते. हे अपयश लपवण्यासाठी आता पालकमंत्र्यांवर चव्हाण टिका करत आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच चव्हाण हे गेल्या काही निवडणूकीच चांगल्या मतांनी निवडून येत आहेत.

सहजपणे मिळालेली ही आमदारकी काहीतरी कामे करण्यात घालवण्याऐवजी आरोप प्रत्यारोपात त्यांनी घालवली. तीन वर्षे त्यांच्याकडे राज्यमंत्री पद होते, मात्र कोणतेही ध्येय्य नसल्याने पदावर असतानाही त्यांना दिसेल असे एकही काम करता आले नाही. चव्हाण हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच ते तथ्यहिन आरोप करत सुटले आहेत.

नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून गेल्या दोन वर्षात एमएमआरडीए, नगर विकास विभाग आणि राज्य शआसनाच्या विविध विभागांकडून तब्बल 1 हजार 690 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आम्ही केलेल्या कामांची यादी देखील आमच्याकडे आहे असे सेनेच्यावतीने जाहीर करण्यात आले. सातत्याने खोटे बोलून मतदारांची फसवणूक करणारा निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेने केला.

आमने सामने येऊन विकासावर बोला; सेनेचे ओपन चॅलेंज

आमदार चव्हाण यांनी आमने सामने येऊन विकासकामांवर चर्चा करावी. त्यांनी केलेली विकास कामे आणि आम्ही केलेली विकास कामे आम्ही दाखविण्यास आम्ही तयार आहोत. असे चॅलेंज युवा पदाधिकारी दिपेश यांनी आमदार चव्हाण यांना केले आहे. त्यांनी हे चॅलेंज स्विकारावे असे आवाहन देखील केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com