
कल्याण ग्रामीण : डायघर गावातील डम्पिंग ग्राउंडवर आज पहाटे धक्कादायक प्रकार समोर आला. मुंबईतील दीड दिवसाच्या गणपती विसर्जन झालेल्या शंभर ते दीडशे ट्रकमधील मूर्ती येथे विल्हेवाटीसाठी आणल्या गेल्या. या अमानुष कृत्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत गाड्या परतवून लावल्या.