बाप रे! देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईतच हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा तुटवडा...

बाप रे! देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईतच हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा तुटवडा...

मुंबई: जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरस गेल्या २ महिन्यांपासून भारतात हाहाकार माजवत आहे. देशात आतापर्यंत १ लाख २५ हजारपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर  १५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. त्यात आता मुंबईत कोरोनाग्रस्तांची आणि रुग्णलयांची चिंता अधिकच वाढत चालली आहे. 

कोरोनाची लस तयार करण्याचं काम जगभरातले अनेक वैज्ञानिक करत आहेत. मात्र अजूनही कोरोनावर औषध मिळू शकलं नाहीये. सध्या देशातले डॉक्टर कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी त्यांना 'हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन' नावाचं औषध देत आहेत. ज्यामुळे त्यांच्या शरीरातला विषाणूंचा प्रभाव कमी होऊन त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होण्यासाठी मदत होते असं बोललं जातंय ,  सिद्ध झालेलं नाही. मात्र हेच महत्वाचं औषध मुंबईत संपायला आलंय की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

मुंबईतल्या खासगी रुग्णालयांमध्ये आणि मेडिकलच्या दुकानांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. जेव्हा खासगी रुग्णालयात कुठलाही कोरोना रुग्ण दाखल होतो तेव्हा हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा शोध घ्यावा लागतो. रुग्ण दाखल झल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन उपलब्ध होऊ शकत नाहीये. 

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं हे औषध जगभरातल्या देशांना भारतातून पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता मुंबईसारख्या सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या शहरातच या औषधाची कमतरता जाणवायला सुरुवात झाली आहे. एका इंग्रजी वेबसाईटवर याबाबत सर्वात आधी माहिती देण्यात आलीये.  

"लोकांना या औषधाचं महत्व आता समजलं आहे. त्यामुळे लोकं आता डॉक्टरांचं खोटं पत्र आणून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन खरेदी करत आहेत. तसंच काही औषध विक्रेते बिल न देता वाजवी पेक्षा जास्त पैसे घेऊन हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन विकत आहेत. त्यामुळेच मुंबईत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची कमतरता जाणवत आहे." असं अन्न आणि औषध परवाना धारक फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी म्हंटलंय. 

अन्न आणि औषध परवाना धारक फाउंडेशननं हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन तयार करणाऱ्या निर्मात्यांची बैठक घेऊन त्यांना  हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा अधिक पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

अशात मुंबईचा वाढता आकडा पाहता लवकरत लवकर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा पुरवठा होणं अत्यंत महत्वाचं आहे.   

shortage of hydroxychloroquine in mumbai read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com