जे.जे रुग्णालयात औषधांचा तुटवडा; हजारो रुग्णांच्या जीवाला धोका

कोरोना रुग्णासाठी लागणारी सर्व औषधी सुद्धा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे.
j.j. hospital
j.j. hospitalesakal

मुंबई : " राज्याच्या आरोग्य व्यवस्थेमधील महत्वाचे मानले जाणारे मुंबईतील सर जे जे रुग्णालयात(J.J. hospital) औषधांचा तुटवडा(medicine shortage) निर्माण झाला आहे. औषध तुटवड्यामुळे हजारो रुग्णांच्या जीवाला धोका असल्याबाबत आमदार अॅड. राहुल नार्वेकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख(Minister of Medical Education amit deshmukh) यांना पत्राने कळवले आहे. जे जे रुग्णालयात 2020-21 मध्ये नोंदणी केलेल्या केवळ 30 टक्के औषधे रुग्णालयात उपलब्ध झाली असून कोरोना रुग्णासाठी लागणारी सर्व औषधी सुद्धा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. दरम्यान, यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (Shortage of medicines at JJ Hospital thousands of patients life in danger )

j.j. hospital
चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीचा विनयभंग; आरोपी अटकेत

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईसह राज्यात वैद्यकीय उपचारांसाठी जेजे रुग्णालयात येणार्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. एन्ट्रानील, सायट्रेट इंजेक्शन, अॅमोक्सीन क्लॅव्ह इंजेक्शन, अॅन्टी स्नेक व्हेनेम, हेपॅटायटीस, बी, इम्युनीग्लोबिन, पॅरोसेटामाॅल, स्टराईल वाॅटर तसेच कोरोना रुग्णासाठी लागणारी सर्व औषधी सुद्धा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, जेजे रुग्णालयात साधे ग्लोव्हज ही बाहेरुन आणण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. दरम्यान, हा सरकारचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार असून हजारो रुग्णांच्या जिवाशी घालवलेला खेळ तत्काळ थांबवून सर जे जे रुग्णालयात औषध पुरवठा सुरळीत करावा. तसेच या प्रकरणी दोषी अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार अॅड. राहुल नार्वेकर यांनी केली आहे.

j.j. hospital
वसई, विरारमध्ये कोरोना हटाव मोहीम

पुरवठादारांची पाठ

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून औषध पुरवठादारांचे थकीत देये सरकारकडून दिले गेले नसल्याने औषध पुरवठादारांनीही रुग्णालयांना औषध पुरवण्याकडे पाठ फिरवली आहे. वारंवार पाठपुरावा घेऊन ही डीएमईआरचे सेक्रेटरी आणि शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. हाफकिनसह ज्यांनी डीएमईआरकडे औषध पुरवठा केला आहे त्यांचे किमान 90 करोड रुपये बाकी आहेत, तर ज्यांनी थेट डीएमईआर अंतर्गत पुरवठा केला होता, त्यांचे किमान 40 करोड देय बाकी आहे. याचा फटका रुग्णालयांनाच बसत आहे. रुग्णालयात बरीचशी औषधं उपलब्ध नाहीत, त्यामुळे, रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा भासत आहे असे ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले आहे.

j.j. hospital
कोल्हापूरात १५२० जणांना बूस्टर डोस

आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून औषधांचा पुरवठा रुग्णालयांना करत आहोत, अजूनही आमची देयके पूर्ण झालेले नाहीत, डीएमईआर यांनीही देयकाविषयीच्या सुचना जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिल्या आहेत पण, आमची देयके अद्याप पूर्ण झालेली नाहीत असे पुरवठादार यांनी नाव नं सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com