गुडघ्याला बाशिंग बांधून 'ते' म्हणतायेत, आशीर्वाद असू द्या!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२०ची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली. ही सोडत जाहीर होताच काही उतावीळ इच्छुक उमेदवारांनी फेसबुक, व्हॉट्‌सअप यांसारख्या समाज माध्यमांद्वारे चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या प्रभागात आपणच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा चंग त्यांच्याकडून बांधला आहे.

नवी मुंबई : महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२०ची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली. ही सोडत जाहीर होताच काही उतावीळ इच्छुक उमेदवारांनी फेसबुक, व्हॉट्‌सअप यांसारख्या समाज माध्यमांद्वारे चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या प्रभागात आपणच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा चंग त्यांच्याकडून बांधला आहे. त्यासाठी समाज माध्यमांद्वारे नियोजनपूर्वक वर्षभर नागरिकांशी संपर्क ठेवल्यानंतर, आता तुमच्या प्रभागातून तुम्ही कोणाला नगरसेवक म्हणून निवडून द्याल? असे प्रश्न विचारत जनतेचा कौल जाणून घेण्यावर भर दिला जात आहे. 

ही बातमी वाचली का? काँग्रेस म्हणतंय, आमचं ठरलंय; रणनीती तयार...

समाज माध्यमांद्वारे जनमताचा कल जाणून घेतल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्येष्ठ नागरिक, मीडिया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत. या उमेदवारांच्या व्यथा सारख्याच असतात. प्रचार सभांमध्ये काय कायम खुर्च्याच उचलायच्या का? पाच वर्षे राबायचे आणि आयात उमेदवारांना उमेदवारी द्यायची, हा कुठला न्याय? तुमचा आशीर्वाद असू द्या, मी यंदा लढणारच आहे, अशी साद मतदारांना घातली जात आहे. त्यात इच्छुक उमेदवारांनी तर समाज माध्यमांवर आपले छायाचित्र टाकत भावी नगरसेवक अशी पोस्टरबाजी सुरू केली आहे. काहींनी प्रभागातील एकाच विषयांचे सात ते आठ निवेदने संबधित प्रशासनाकडे दिले आहेत. त्याचा आधार घेत प्रभागातील कामांबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार करत स्वत:ची प्रतिमा वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ही बातमी वाचली का? प्रवाशी म्हणतायेत, एसी लोकल नको रे बाबा!

शुभेच्छांचा वर्षाव 
निवडणूक तीन महिन्यांवर आली असली, तरी इच्छुक व नगरसेवकांनी वर्षभरापासूनच तयारी सुरू ठेवली आहे. प्रभागात आज पाणी येणार नाही, असा संदेश तर व्हॉट्‌सॲपवर न चुकता येतो. राष्ट्रपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीचे संदेश, सणांच्या शुभेच्छा आपल्या फोटोसह मतदारांपर्यंत पोहोचतील, अशी व्यवस्था उमेदवारांनी वर्षांपासून केली आहे. 

ही बातमी वाचली का? नवी मुंबई राखण्यासाठी भाजपने आखला 'हा' प्लॅन

सायबर साक्षर युवकांची फौज 
जे इच्छुक उमेदवार, नगरसेवक फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌सॲप, इंटरनेट समर्थपणे हाताळू शकतात त्यांची चलती जास्त आहे. जनमताच्या कौलाचे खूळ त्यांच्याच सुपीक डोक्‍यातून आल्याचे समजते. त्याचा धसका घेत समाज माध्यमांचा गंध नसलेल्या उमेदवार व नेत्यांनी सायबर साक्षर युवकांची फौज बाळगण्यास सुरुवात केली आहे. या सायबरतज्ज्ञांच्या मदतीने जनमताचा कल जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social media scrutiny of candidates for navi mumbai municipal corporation election