कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिला सामाजिक संदेश, म्हणाली...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

 नेहमी सामाजिक कार्यात सक्रीय असणाऱ्या सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सध्या सबंध महाराष्ट्रभरात कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींबरोबर होत असणाऱ्या भेदभावपूर्ण व्यवहाराविरुद्ध “#विचारबदला” या व्हिडिओच्या माध्यमातून आवाज उठवला.  

मुंबई : नेहमी सामाजिक कार्यात सक्रीय असणाऱ्या सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सध्या सबंध महाराष्ट्रभरात कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींबरोबर होत असणाऱ्या भेदभावपूर्ण व्यवहाराविरुद्ध “#विचारबदला” या व्हिडिओच्या माध्यमातून आवाज उठवला.  

नक्की वाचा : अबब! गरिबांच्या जेवणावरही डोळा, 80 हजार जेवणाची पाकीटं खाल्ली तरी कोणी?

कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या किंवा संक्रमण संशयित असलेल्या व्यक्ती प्रति भेदभाव दर्शविण्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. नुकतीच मुंबईच्या लालबागमधील एक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका मराठी वृत्तपत्रासह काम करणाऱ्या 24 वर्षीय फोटो जर्नलिस्टला संस्थात्मक विलगीकरण केंद्रतून घरी परत आल्यावर त्याच्याच शेजार्‍यांनी त्याला शिवीगाळ केली.  कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आणि त्यांच्या कुटूंबियांसोबत गैरवर्तन करु नका असे आव्हान खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केेले आहे.

नक्की वाचा : म्हणून 'त्या' पाच मुली देणार कोरोनाची अग्निपरीक्षा, जाणून घ्या अधिक...

सोनालीचा हा व्हिडिओ मुंबईच्या वातावरण व झटका या एकत्र काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी जनजागृतीच्या हेतूने तयार केला आहे. 'टर्टल ऑन अ हॅमॉक'चे गीता सिंग व अविनाश सिंग यांच्या संकल्पनेतून या चित्रफितीचे अनावरण झाले. 

हे नक्की वाचा : पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय

या व्हिडिओच्या माध्यामातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कोव्हिड पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींचा व त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा व त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी असा आग्रह व्यक्त केला आहे. सोनाली कुलकर्णी म्हणाली, “कोव्हिड पॉझिटिव्ह संक्रमित असलेल्या व्यक्तींना कशाची भीती आहे? दुर्दैवाची बाब अशी आहे की, आज काल काही लोकांसाठी कोविड पॉझिटिव्ह असणं हे कुठल्या ही गुन्ह्यापेक्षा कमी नाही. पण हे चुकीचं आहे आणि आपण ही मानसिकता बदललीच पाहिजे.

हे ही वाचा अन् दारुची दूकाने उघडलीच नाही... नवी मुंबईतील तळीरामांचा हिरमोड

"एकमेकांशी हात मिळवणे गरजेचे नाही पण, कोव्हिड पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा व त्यांच्याबद्दल निर्माण केलेली सामाजिक कलंकत्वाची प्रतिमा तोडणे गरजेचे आहे. "मिठी मारू नका, शेक हॅन्ड ही करू नका....पण कोरोनाला हरवण्यासाठी योग्य विचार नक्की करा," असा सामाजिक संदेश देखील सोनाली कुलकर्णीने दिला.

 Social message given by actress Sonali Kulkarni on the background of Corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social message given by actress Sonali Kulkarni on the background of Corona