
पुण्यातील एल्गार परिषद प्रकरण व अर्बन नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले प्रसिद्ध तेलुगू कवी वरावरा राव(81) यांची प्रकृती अचानक खराब झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी विशेष न्यायालयाने 2 जूनपर्यंत राव यांचा वैद्यकीय अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई: पुण्यातील एल्गार परिषद प्रकरण व अर्बन नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले प्रसिद्ध तेलुगू कवी वरावरा राव(81) यांची प्रकृती अचानक खराब झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी विशेष न्यायालयाने 2 जूनपर्यंत राव यांचा वैद्यकीय अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
राव यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. राव यांची तब्येत बिघडल्यानंतर शनिवारी त्यांच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांनी जे.जे. रुग्णालयाने राव यांचा सविस्तर वैद्यकीय अहवाल देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. 81 वर्षीय राव यांना इतरही आजार असल्यामुळे राव यांना जामीन मिळावा, अशी मागणी यापूर्वीच राव यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
वरावरा राव हे तळोजा कारागृहात मध्ये असल्याने त्यांना तळोजा जेलमधून मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भोवळ येऊन अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना काराहातून हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी राव यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, राव यांची प्रकृती आता स्थिर आहे.
हेही वाचा: कोरोना वॉर्डातून मिळाला डिशचार्ज, घरी आलेत आणि अवघ्या चार तासात....
राव यांनी याप्रकरणी जामिनासाठी अर्ज केला असताना न्यायालयाने 28 मेला तळोजा कारागृहाला वैद्यकीय अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यावेळी कारागृह प्रशासनाने अर्ज सादर केला नव्हता. अखेर न्यायालयाने कारागृहाला पुन्हा या अहवालाबाबत आठवण करून दिली आहे. पुणे पोलिसांनी नोव्हेंबर 2018 मध्ये राव यांना अटक केली होती. पुढे फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण राष्ट्रीय तपास पथकाला हस्तांतरीत करण्यात आले होते.
special court asked for medical certificate of varvara rao read full story