सकाळ चित्रकला स्पर्धा 2020 : रंगांच्या दुनियेत हरवले बालचित्रकार

कल्याणच्या मातोश्री विद्यालयात जमलेले बालचित्रकार
कल्याणच्या मातोश्री विद्यालयात जमलेले बालचित्रकार

मुंबई : थंडीचे दिवस आणि त्यातही रविवारची सुट्टी असतानाही अनेक बालकलाकारांनी रविवारी सकाळीच शाळेत हजेरी लावली होती. निमित्त होते, "सकाळ माध्यम समूहा'ची चित्रकला स्पर्धा. राज्यस्तरीय स्पधेच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल शहरांसह रायगड, ठाणे अन् पालघर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी रंगांच्या दुनियेत हरवून गेले.

पु. ना. गाडगीळ अॅण्ड सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड "सकाळ' चित्रकला स्पर्धा म्हणजे बालचित्रकारांसाठी मोठे व्यासपीठच ठरली. एकाच वेळी एकूण 57 केंद्रांवर स्पर्धा उत्साहात पार पडली. 

हे वाचले का : विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकाचा असाही सन्मान

शहरातील विविध केंद्रांवर "सकाळ' बालचित्रकला स्पर्धेसाठी हातात रंगसाहित्य घेऊन मोठ्या उत्साहाने मुले हजर झाली होते. स्पर्धेविषयीची त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यांच्या पालकांचाही उत्साह दांडगा होता. 

वरळीतील मराठा हायस्कूल केंद्रावर स्पर्धेसाठी सकाळीच पोहोचलेल्या मुलांनी स्पर्धेचा कागद हातात पडेपर्यंत संपूर्ण वर्ग डोक्‍यावर घेतला होता. कोणते चित्र काढायचे, माहिती कशी भरायची इत्यादी एक ना अनेक प्रश्‍न विचारून त्यांनी शिक्षकांना भंडावून सोडले. मात्र कागह हातात पडताच मुले रंगांच्या दुनियेत रममान झाली. जवळजवल सर्वच केंद्रांवर असे चित्र होते. पाल्याला प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनीही आवर्जून केंद्रावर हजेरी लावली होती. शाळेच्या शिक्षवृंदाने "सकाळ'च्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

हेही वाचा : हवशे, नवशे आणि गवशांची म्हसा यात्रेत मौजमजा ​

ठाणे शहरात "धी युनायटेड स्पोर्ट क्‍लब'चे शिशुविकास मंदिर चेंदणी कोळीवाडा, यशोधननगर येथील संकल्प विद्यालय, कळव्यातील गोपाळ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे शिशुविहार विद्यामंदिर, डोंबिवलीत साई संस्था गणेश विद्यालय, ज्ञानमंदिर विद्यासंकुल एमआयडीसी इत्यादी केंद्रांवर चिमुकल्यांचा रंगांचा आविष्कार पाहायला मिळाला. 

कल्पनाशक्तीला वाव देणारे विषय 
तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी पर्यावरण एक अविभाज्य घटक असून त्याचे रक्षण आपण केलेच पाहिजे असा संदेश देणारे चित्र, पाण्याखालची जीवसृष्टी, वृक्षारोपण इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी रेखाटलेला आविष्कार सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. निवडणूक प्रचार, रोबो कार्यशाळा आणि भारतीय अंतराळ मोहीम-चांद्रयान अशा विषयावरही अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळी चित्रे रेखाटली. काही मुलांनी "वृक्ष बचाव'चा संदेश चित्रातून दिला. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे सर्वच स्तरातून कौतुक होत होते. 
लहान मुलांनी आवडता प्राणी, कार्टुन, साहसी खेळ, आकाशातील पतंग, मोटू और पतलू, वाढदिवसाचा केक आदी चित्रे रेखाटून त्यात खडूने रंग भरण्याचा आनंद लुटला. 

महत्त्वाचे : केरळमधील दांपत्याला मुंबईतून मूल दत्तक

विद्यार्थ्यांना चित्ररूपी व्यासपीठ! 

शालेय विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड असतेच. चित्रकलेचा तास म्हटले की मुले खूश असतात. "सकाळ'च्या बालचित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभतो. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील चित्ररूपी कवाडे उघडतात आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध होते, अशी भावना डोंबिवलीतील साई संस्था गणेश विद्यालयातील शिक्षक मनोज गोसावी व शाळेतील कर्मचारी सुनील हगवणे यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com