एसटी महामंडळानं घेतला महत्वाचा निर्णय; अधिकाऱ्यांचा रजा प्रवास भत्त्ता होणार बंद.. 

ST BUS
ST BUS

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाकडून काटकसरीचे धोरण राबवण्याची सुरुवात केली आहे. एसटी महामंडळातील वर्ग 1 आणि 2 च्या पदातील अधिकाऱ्यांना मिळणारी रजा प्रवास भत्ता आता महामंडळाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीत व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहे.  लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्यामुळे महामंडळाचा दैनंदिन तोटा सहन करावा लागतो आहे. अशापरिस्थितीत आर्थिक काटकसर केली जात आहे. 

40 टक्के प्रवासी असलेल्या बसेसच्या फेऱ्या  बंद करण्याचा तसेच रातराणीच्या फेऱ्यांमध्ये चालक तथा वाहकांची नियुक्ती करून एका वाहकांची बचत करण्याचे आदेश सुद्धा एसटी महामंडळाने दिले आहे. आता त्याच पाठोपाठ एसटी महामंडळातील  वर्ग 1 आणि 2 च्या 578 अधिकाऱयांना  मिळणाऱ्या  रजा प्रवास भत्ता बंद करण्यात येणार आहे. 

काय आहे रजा प्रवास भत्ता ?

शासनाच्या धर्तीवर महामंडळातील अधिकाऱ्यांना सहकुटुंब सहलीसाठी जाण्याकरिता एसटी महामंडळाकडून रजा प्रवास भत्ता देण्याची योजना आहे. हा भत्ता दोन वर्ष 24 हजार रुपये तर चार वर्षात 48 हजार रुपये असा देण्यात येत होता. या योजनांवर प्रत्येक वर्षी एसटी महामंडळाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येत होते. मात्र, कोरोनाच्या या संकट काळात एसटी आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे बचतीसाठी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ST cancelled travel allowance of employees 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com