अत्यावश्यक वस्तूंच्या मालवाहतूकीवर 'एसटी'ने काढला तोडगा, रायगड जिल्ह्यासाठी 'खास' सेवा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

लॉकडाऊनच्या काळात मालवाहतुकीवरील विपरित परिणाम रोखण्याकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसमधून आवश्यक वस्तू वाहून नेण्यात येणार आहेत.

अलिबाग : लॉकडाऊनच्या काळात मालवाहतुकीवरील विपरित परिणाम रोखण्याकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसमधून आवश्यक वस्तू वाहून नेण्यात येणार आहेत.

नक्की वाचा : एसटी कामगारांची इम्युनिटी वाढवण्यासाठी 'हे' औषध द्या..महाराष्ट्र एसटी कामगार सेनेनं केली मागणी    

राज्य सरकारने त्यासाठी मंजुरी दिली असून रायगड जिल्ह्यातील 8 आगार व 13 बसस्थानकांमार्फत ही मालवाहतूक करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक आगार व बसस्थानकावर बुकिंगची व्यवस्था केली जाणार आहे.

मोठी बातमी : थरकाप उडवणारा फोटो : KEM रुग्णालयातील शवागृह भरलं, मृतदेह ठेवलेत चक्क 'इथे'...

कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या या आपत्कालीन परिस्थितीत शेतकरी व व्यावसायिकांना त्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळ नक्कीच चांगली सेवा देऊन शासनाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेल अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

महत्वाची बातमीसंजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, महाराष्ट्रातील सरकारबाबत केलं 'मोठं' भाष्य...

मालवाहतुकीबाबत योग्य माहिती देण्यासाठी राज्य परिवहन रायगड विभागाचे विभागीय कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या 8275066400 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले आहे.

ST issues settlement on essential freight, special service for Alibag district


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST issues settlement on essential freight, special service for Alibag district