18 जानेवारीपासून एसटीचे सुरक्षितता अभियान, अपघातमुक्त सेवा देण्यासाठी एसटीचे चालक कटिबद्ध

प्रशांत कांबळे
Saturday, 16 January 2021

सद्यस्थितीत कोव्हीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सुरक्षितता मोहीम राबविताना कोव्हीड-19 विषाणू प्रादुर्भाव टाळणे करिता सुरक्षित अंतराबाबतचे (सोशल डिस्टंसिन्ग ) शासन निर्देशांचे पालन करून सुरक्षितता मोहीम राबविली जाणार आहे.   

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीमध्ये 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे. दररोज सुमारे 65 लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे.

गेल्या 72 वर्षात अविरत आणि सुरक्षित सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या मनात एसटी बद्दल विश्वासार्हतेची भावना निर्माण झाली आहे. या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळामध्ये दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेदरम्यान चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो. सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे 35 हजार 962 चालक कार्यरत आहेत.

महत्त्वाची बातमी : एकीकडे लसीकरणाला सुरवात, दुसरीकडे सायबर हल्लेखोरही झालेत ऍक्टिव्ह; लोकहो सावधान !

अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुदृढ करण्याच्या दृष्टीने आगार पातळीवर प्रबोधन देखील करण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात इतर प्रवासी वाहनांच्या तुलनेतएसटीच्या अपघातांची संख्या कमी आहे. या सुरक्षितता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुकीचे नियमाचे पालन, उत्तमशरीर प्रकृती आणि मन:स्वास्थ्य या चतुसुत्रीचे पालन करीत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेला अपघात विरहित सेवा देण्याचे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने  यांनी  केले आहे. 

महत्त्वाची बातमी :  कुबेराची मायानगरी मुंबईत मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव उभा करतायत राम मंदिरासाठी निधी

सद्यस्थितीत कोव्हीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सुरक्षितता मोहीम राबविताना कोव्हीड-19 विषाणू प्रादुर्भाव टाळणे करिता सुरक्षित अंतराबाबतचे (सोशल डिस्टंसिन्ग ) शासन निर्देशांचे पालन करून सुरक्षितता मोहीम राबविली जाणार आहे.   

ST safety campaign to start from January to provide accident free service


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST safety campaign to start from January to provide accident free service