

BMC Administrative Reshuffle
Esakal
मुंबई : पालिकेच्या प्रशासकीय रचनेत राज्य सरकारने महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. सुधारित मुंबई महापालिका अधिनियमांतर्गत चार अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या जबाबदारीत फेरबदल करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून या सर्व अधिकाऱ्यांनी नव्याने पदभार स्वीकारला असून, त्यांच्या खात्यांचे वाटपही जाहीर करण्यात आले आहे.