एकदाची परीक्षा घ्या आणि चिंतामुक्त करा; नीट, जेईई विद्यार्थ्यांची ऑनलाईन याचिका...

संजय घारपुरे
Monday, 3 August 2020

प्रवेश परिक्षा लांबणीवर पडल्यास विद्यार्थी तसेच पालक जास्त निराश होतील, त्यामुळे त्याकडे तातडीने लक्ष द्यावी अशी विनंती काही पालकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांना केली आहे.

मुंबई : कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परिक्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. त्याचा फटका प्रामुख्याने उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. आता जेईई, नीट परिक्षा पुन्हा लांबणीवर पडल्याची चर्चा सुरु झाल्याने त्याबाबत ऑनलाईन याचिका करण्यात येणार आहे. 

लॉकडाऊनमध्येही गुटख्याची तस्करी जोरात; ठाण्यात पुन्हा एकदा लाखोंचा मुद्देमाल जप्त....

जेईई मेन्स परिक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान, तर नीट - यूजी परीक्षा 13 सप्टेंबरला अपेक्षित आहे. मात्र यूपीएससी, एनडीएची परिक्षा याच सुमारास होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय चाचणी प्राधिकरणाकडून (National Testing Authority) पुन्हा एकदा जेईई तसेच नीटची परिक्षा लांबणीवर टाकणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता हेच थांबवण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यामुळे त्यासाठी ऑनलाईन आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबईसह देशभरातील एक हजारहून जास्त पालक, विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. त्यांनी याद्वारे राज्य सरकार, शिक्षण मंत्रालय तसेच राष्ट्रीय चाचणी प्राधीकरण (National Testing Authority) आधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.

सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांचा 'मोठा' खुलासा, उघड केली 'ही' माहिती...

नीट तसेच जेईई परिक्षा देणारे विद्यार्थी दोन वर्षे रोज बारा तास अभ्यास करीत आहेत दरवेळी परिक्षा लांबवण्याचा निर्णय होतो, त्यावेळी त्यांच्यात नैराश्य होते. त्यांचे आता अभ्यास करताना पूर्ण लक्ष केंद्रीत होत नाही, अशी खंत व्यक्त होत आहे. दोन्ही परिक्षा लॉकडाऊन असतानाही घेता येईल. त्यावेळी या परिक्षेस सामोरे जाणाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात यावी. त्यावेळी लॉकडाऊनची देशभरात कठोरपणे अंमलबजावणी होईल, त्याचबरोबर सुरक्षित अंतराचे पालन होण्यासाठी जास्तीत जास्त शाळा तसेच महाविद्यालयात ही परिक्षा घेण्यात यावी. त्याचबरोबर या परिक्षेस येणाऱ्यांची चाचणी करण्यात यावी अशी सूचना पालकांनी केली आहे. 

विमान प्रवाशांचा केला सर्व्हे, उत्तरं ऐकून विमान कंपन्यांच्या पायाखालची जमीन सरकली

प्रवेश परिक्षा लांबणीवर पडल्यास विद्यार्थी तसेच पालक जास्त निराश होतील, त्यामुळे त्याकडे तातडीने लक्ष द्यावी अशी विनंती काही पालकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांना केली आहे. मात्र त्यावर मंत्र्यांनी किंवा सरकारने याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.
----
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: studnets of jee and neet files online petition to not extend exams again and again