esakal | व्हायरल न्यूमोनिया आणि फुफ्फूसात पू झालेल्या बाळावर यशस्वी उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

व्हायरल न्यूमोनिया आणि फुफ्फूसात पू झालेल्या बाळावर यशस्वी उपचार

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : व्हायरल न्यूमोनिया (Pneumonia) आणि फुफ्फुसात पू खालावलेली आँक्सिजन (Oxygen) मात्रा आणि हदयाचे ठोके यामुळे व्हेंटिलेटरवर (ventilator) ठेवण्यात आलेल्या बाळाला वोक्हार्ट हॉस्पिटल (Wockhardt Hospital) मीरा रोड (Mira Road) येथील डॉक्टरांनी (Doctor) जीवनदान दिले. पालघर (Palghar) जिल्ह्यातील विरार (Virar) येथे राहणाऱ्या दीड महिन्याच्या बाळावर यशस्वी उपचार करण्यात आले. आई वडीलांची परिस्थिती नसल्याने बाळाच्या शस्त्रक्रियेचा खर्च सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून क्राऊडफंडिंगव्दारे (crowdfunding) जमा करण्यात आला होता. मुलाची प्रकृती सुधारल्यानंतर दीड महिन्यांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

पावसाळ्यात लहान मुलांमध्ये व्हायरल न्यूमोनियाची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून वेळीच तज्ञ डाँक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

वोक्हार्ट रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ.अंकित गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या चमूने मुलावर उपचार केले आणि बाळाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढत एक नवे आयुष्य दिले. श्रेयसचा जन्म 16 एप्रिल 2021 रोजी विरारमध्ये राहणाऱ्या जगधने दाम्पत्याच्या कुटुंबात झाला. मुलाच्या जन्मावेळी कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. दोन महिन्यांनंतरच बाळाला सतत खोकला येऊ लागला. स्थानिक डॉक्टरांनी औषधे आणि नेब्युलायझेशन दिले. पण, प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. मुलाने दूध पिणे देखील बंद केले. मुलाची बिघडलेली तब्येत पाहून पालकांनी त्याला मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आणि बाळाचे प्राण वाचविले.

हेही वाचा: बॅंक खात्याची माहिती देताना काळजी घ्या : पोलिस अधीक्षक योगेशकुमार

वोक्हार्ट हॉस्पिटलमधील बालरोग तज्ञ तसेच क्रिटिकल केअर तज्ञ डॉ.अंकित गुप्ता यांनी या बाबत माहिती देताना सांगितले कि, बाळाला ज्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्याला 102 अंश फॅरेनहाइट ताप होता, ऑक्सिजन सॅच्युरेशन 68%, पल्स रेट देखील कमी होता आणि रक्तदाब कमी होता. जर ताबडतोब उपचार केले नाही तर काही तासातच मुलाचा मृत्यू होण्याची शक्यता होती. बाळाला पावसाळ्यामुळे व्हायरल न्यूमोनिया झाला. सीटीस्कॅनमध्ये असे आढळून आले की मुलांच्या फुफ्फुसात पू जमा झाला आहे. यामुळे त्याच्या हृदयावर परिणाम झाला. अशा स्थितीत श्वास घेण्यात अडचणी येणे, खोकला, सर्दी, ताप,घशात घरघर आणि थकवा येणे यासारखी लक्षणे दिसतात. हे जंतू सहसा तुमच्या श्वसन प्रणालीच्या वरच्या भागाला चिकटतात. पण जेव्हा ते तुमच्या फुफ्फुसात जातात तेव्हा त्रास सुरू होतो.

हेही वाचा: विष पिऊनही मृत्यू न आल्याने तीने आयसीयूमध्ये घेतला गळफास

डॉ. गुप्ता म्हणाले, मुलाला दोन आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर मुलाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. एका महिन्यानंतर मुलाचा ताप कमी झाला आणि सर्व लक्षणे निघून गेली. मुलाच्या ऑक्सिजनची पातळी 96 टक्के होती. बाळाने पुन्हा स्तनपानाला सुरूवातही केली. बाळाच्या आरोग्यातील सुधारणा पाहून बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. पावसाळ्यादरम्यान नॉन-कोविड न्यूमोनियामध्ये थोडी वाढ झाली आहे आणि सुमारे 56 मुलांवर आमच्याकडून यशस्वी उपचार करण्यात आले. फुफ्फुसांचे संक्रमण सामान्य आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये फ्लूची लस देणे सामान्य व्हायरल न्यूमोनियाविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करणे अत्यावश्यक आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना मुलाचे वडील सागर जगधने म्हणाले, मुलाला व्हायरल न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्यावर आम्ही खूप घाबरलो होतो. मुलाला सतत खोकला येत होता. स्थानिक डॉक्टरांकडून औषधे सुरू करण्यात आली होती, पण तब्येत बिघडत चालली होती. मुलाची बिघडलेली प्रकृती पाहून आम्ही आशा गमावू लागलो होतो. पण वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मुलावर उपचार करून त्याला नवीन आयुष्य बहाल केले. एवढेच नाही तर आमच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते, पण रुग्णालयाने क्राउडफंडिंगद्वारे मुलावर उपचार केले. मला डॉक्टरांचे आभार मानायचे आहेत. कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे माझ्या मुलाचा जीव वाचला आहे.

loading image
go to top