esakal | सुशांत सिंह मृत्यूप्रकरणः बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आलिशान कारमधून ड्रग्सची तस्करी
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणः बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आलिशान कारमधून ड्रग्सची तस्करी

बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवताना संशय येऊ नये यासाठी आलिशान मर्सिडीज कारचा वापर तस्कर करत असल्याची बाब केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाली आहे.

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणः बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आलिशान कारमधून ड्रग्सची तस्करी

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई:  बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवताना संशय येऊ नये यासाठी आलिशान मर्सिडीज कारचा वापर तस्कर करत असल्याची बाब केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी शनिवारी दोन मुख्य वितरकांसह सहा जणांना अटक केली असून तस्करीसाठी वापरण्यात येणारी मर्सिडीज जप्त करण्यात आली आहे.  

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पेजथ्री, बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवणाऱ्या रॅकेटचा माग घेणाऱ्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधीत पथकानं (एनसीबी) मुंबई, गोवा येथे शोध मोहिम राबवली. याप्रकरणी करमजीत सिंग, ड्वेन फर्नाडीस, संकेत पटेल, अंकुश अनरेजा, संदीप गुप्ता आणि आफताब फतेह अन्सारी या सहा जणांना एनसीबीने अटक केली आहे. त्यातील अंकुश अनरेजा हा हॉटेल व्यावसायिक असून पवईतील एका बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. याशिवाय करमजीत आनंद उर्फ केजे दोघेही मोठे ड्रग्स वितरक आहेत. यातील अनरेजाकडून एनसीबीने मर्सिडीज कार जप्त केली आहे.  त्याचा वापर ड्रग्स तस्करीसाठी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  केजे याने अंधेरीतील क्लबमध्ये सुशांतला वीड(गांजा) पुरवला होता. तसेच रिया चक्रवरीच्या सांताक्रूझ येथील घरी आणि सुशांतच्या वांद्रे येथील घरीही केजेने ड्रग्स पोहोचवले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.  या सर्व आरोपींना आज न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. यातील अनरेजाकडून सव्वा लाख तर केजेकडून साडे पाच लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

अधिक वाचाः  मुंबईकडे पुन्हा पावसाची पाठ, जाणून घ्या पावसासंदर्भातले अपडेट्स


शोध मोहिमेत करनजीत सिग आनंद(23) याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील दादर पश्चिम येथून डायवान अँथोनी फर्नांडीस याच्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. शिवाजी पार्क येथील रहिवासी असलेला फर्नांडीस हा गांजा वितरक असून त्यांच्याकडून 500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. सुशांत सिंगचा नोकर दिपेश सावंतला फर्नाडीसने ड्रग्स दिले असल्याचे दिपेशच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

हेही वाचाः  मुंबईकर काळजी घ्या, मुंबईतल्या 'या' भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय
 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक(एनसीबी) पेज थ्री सेलिब्रिटींशी संबंधीत अनुज केशवानी या बड्या वितरकाला अटक केल्यानंतर  ड्रग्स पुरवणा-या रॅकेटशी संबंधीत इतरांच्या शोधात आहेत. फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा आणि अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलिवूड वर्तुळात ड्रग्स पुरवठा करणारे डझनभर वितरक आता अंडरग्राऊंड झाले आहेत. यावेळी मिरांडा आणि शौविक चक्रवर्तीच्या चौकशीत केजेचे नाव पुढे आले होते. त्यासाठी एनसीबीने रविवारी विशेष शोध मोहिम राबवली.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Sushant Singh death case Drugs smuggled luxury car Bollywood celebrities