esakal | सुशांतसिंहच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर CBI ने उपस्थित केले प्रश्नचिन्ह; एम्सच्या डॉक्टरांकडून होणार पडताळणी
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांतसिंहच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर CBI ने उपस्थित केले प्रश्नचिन्ह; एम्सच्या डॉक्टरांकडून होणार पडताळणी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदन अहवालाबद्दल काही प्रश्न केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिका-यांनी उपस्थित केले असून त्याची पडताळणी करण्यासाठी  एम्सच्या डॉक्टरांचे पथक नियुक्त केले आहे.

सुशांतसिंहच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर CBI ने उपस्थित केले प्रश्नचिन्ह; एम्सच्या डॉक्टरांकडून होणार पडताळणी

sakal_logo
By
अनिश पाटील


मुंबई ः  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदन अहवालाबद्दल काही प्रश्न केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिका-यांनी उपस्थित केले असून त्याची पडताळणी करण्यासाठी  एम्सच्या डॉक्टरांचे पथक नियुक्त केले आहे. डॉक्टर सुधीर गुप्ता या पथकाचे नेतृत्व करीत असल्याचे सीबीआयमधील एका अधिका-याने सांगितले.

सीबीआयसह फॉरेन्सिक विभागातील अधिकारी सुशांतसिंहच्या घरी दाखल; सखोल तपास सुरू

शवविच्छेदनाबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात शवविच्छेदन अहवालामध्ये टाइम स्टँप नाही. पोलिसांना याबाबत डॉक्टरांना प्रश्न विचारणे आवश्यक होते की वेळेचा कॉलम रिकामा का आहे. मात्र पोलिसांनी असे केले नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिली आहे. यामुळे या शवविच्छेदन अहवालाची पडताळणी करण्यासा तीन ते चार दिवस जाण्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवालात वेळेचा रकाना रिकामा असण्यबाबत ते मुंबईतील डॉक्टरांशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यानंतर याबाबत विस्तारित प्रतिक्रिया दिली जाईल.  सुशांतच्या शवविच्छेदन अहवाला बाबत शंका उपस्थित झाल्याने न्यायवैधक तज्ज्ञांचे पथक त्याच्या शरीरावरच्या जखमांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करणार असून त्याचा अहवाल सीबीआयला देणार आहे.

कार चालकाला ठोठावला हेल्मेट न घातल्याचा दंड; ई चलान पाहून चालकाची पोलिसांत धाव

 ही आत्महत्या असेल की हत्या याबाबतही हे पथक त्यांचे मत देणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. सीबीआयने यासंदर्भात न्ययवैद्यक विभागाला विनंती केली होती. त्यानुसार न्यायावैधक विभागाचे प्रमुख डॉ सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडे असलेली कागदपत्र आणि सर्व अहवाल यांचा अभ्यास करून ही समिती आपला अहवाल देणार आहे. तर दुसरीकडे सीबीआयने सुशांतच्या आचा-याची चौकशी केली असता, त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबाशीही त्याची पडताळणी करण्यात आली आहे.  

गणपतीच्या सजावटीत चूक झाल्याने अभिनेते प्रवीण तरडे ट्रोल, व्हिडिओ शेअर करत मागितली दलित बांधवांची माफी

याप्रकरणी रिया चक्रवर्ती आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी देखील सीबीआय लवकरच चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या घरात सीबीआयने आत्महत्येच्या घटने दिवशी घडलेला संपूर्ण आभासी स्वरूपात केला. शनिवारी ते पूर्ण झाले नसून रविवारीही पुन्हा घराची तपासणी करण्यात येणार असल्याची सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.दरम्यान, मृत्यूपूर्वी सुशांतच्या घरी पार्टी होती, हा दावा शेजा-यांनी खोडून काढला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या आदल्या दिवशी सुशांतच्या घरातले दिवे लवकर बंद झाले होते. त्यामुळे पार्टी असण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगण्यात आले आहे.