
मुंबई - कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईकरांचे पाणी महाग होणार आहे. पाणी पट्टीत ४ ते ६ टक्के वाढ होणार असून येत्या १६ जून २०२० पासून ही नवी दरवाढ लागू होण्यांची शक्यता आहे. पाणी दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
जलवाहिन्यांची देखभाल, ब्रिटीशकालीन जलवाहिन्या बदलत नवीन जलवाहिन्या टाकणे, मुंबई बाहेरुन म्हणजेच शहापूर येथून जलवाहिनी द्वारे मुंबईत पाणीपुरवठा करणे, मुंबईकरांना पुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध करत पुरवठा करणे यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
मुंबईकरांकडून प्रत्येक हजार लिटर मागे ३ ते ४ रुपये आकारले जातात. परंतु प्रत्येक एक हजार लिटर पाणी शुद्धीकरणावर २४ रुपये खर्च करण्यात येतो. त्यामुळे जलवाहिन्यांच्या देखभालीपासून पाणीपुरवठा यावर होणाऱ्या खर्चाचा तालमेल बसावा म्हणून काही प्रमाणात पाणी पट्टीत वाढ करण्यात येते, असं मुख्य जल अभियंता ए. राठोड यांनी सांगितले.
भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, विहार व तुळशी या सातही धरणांतून दीड कोटी मुंबईकरांना दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे घरगुती व व्यावसायिक वापराच्या पाणी दरात १६ जून २०२० पासून ही दरवाढ लागू होणार असल्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्याने सांगतिले. दरम्यान, पाणी पट्टीत वाढ झाल्यानंतर मल:निसरण शुल्कातही वाढ होणार असल्याचे पालिकेच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. हॉटेल, मॉल, उद्योगासाठी सध्याचे दर प्रत्येक एक हजार लिटरसाठी 20 रुपयांपासून 152 रुपयांपर्यंत आहेत.
मोठी बातमी - खजुराच्या नावाखाली सुरु होता गोरखधंदा, यावेळी माल आलेला दुबईवरून, पण...
२ हजार कोटी थकबाकी
पाणीपट्टी (जल कर) आणि थकबाकी सुमारे २ हजार कोटींच्या घरात गेली आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीची (जल कर) अधिकाधिक वसुली होण्यासाठी महापालिकेच्या संबंधित खात्यांतर्फे विभाग स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे समजते.
tax on water expected to increase in mumbai mumbaikar may have to pay extra money
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.