

Tejasvi Ghosalkar to Join BJP Ahead of Elections
Esakal
मुंबईत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी सहा महिन्यांपूर्वीच महिला शाखेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. आता त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. तर तेजस्वी यांचे सासरे हे माजी आमदार आहेत. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दादरमध्ये तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचीही माहिती समजते.