
Tejswini Ghosalkar: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाली आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होतं. काही दिवसांपासून तेजस्विनी घोसाळकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे मुंबई जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आहे. प्रवीण दरेकर हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आपण भाजपसोबत जाणार की ठाकरेंसोबत राहणार यावरही त्यांनी थेटपणे भाष्य केलं आहे.