

Deepak Sawant Corporator post cancelled
ESakal
मुंबई : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांना आपले नगरसेवकपद गमवावे लागले आहे. मुंबई महापालिकेच्या सभागृहात महापौर रितू तावडे यांनी सावंत यांची सदस्यता रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली. महापालिका निवडणूक होऊन अवघे सहा महिने झाले असतानाच ठाकरे गटाला लागलेला हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे.