Thane Crime: हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याने घातला धिंगाणा केला; चॉपरने हल्ला

Crime News
Crime Newsesakal

Thane Crime: हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर ती आणण्यास उशीर झाल्याने टेबल उलटवून हॉटेलमध्ये धिंगाणा घालणाऱ्या तिघांविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी फरारी असून त्यांचा पोलिस शोध घेत असून सर्व प्रकार सीसीटीव्‍हीमध्ये कैद झाला आहे. या वेळी चॉपरहल्ल्यात हॉटेलमधील दोघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

Crime News
Nagpur Crime : उपराजधानीत वाढतोय नशेचा बाजार; गांजा, एमडीच्या तस्करीत वाढ

ब्रह्मांडच्या आझादनगर परिसरात ‘सागर गोल्डन हिल टॉप’ हे तक्रारदार संतोष कोरगय्या शेट्टी यांचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बुधवारी (ता. २२) रात्री ११ च्या सुमारास ओंकार भोसले आणि अभी पाटील हे दोघे आले होते. ते टेरेसवर बसले होते. तेथे त्यांचा आणखी एक मित्र आला. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती, मात्र ती आणण्यास उशीर झाल्याने तिघांनी जोरजोरात टेबल वाजवण्यास सुरुवात केली. तसेच वेटरला शिवीगाळ करू लागले. तक्रारदार शेट्टी यांनी त्यांना टेबल वाजवण्यास मनाई केली.

Crime News
Crime News: बुलढाण्यात अल्पवयीन मुलाकडून अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; घटनेनं खळबळ

त्याचा राग आल्याने अभी पाटील याने टेबल उलटे केले. त्यानंतर शेट्टी यांनी तिघांना वेटरच्या मदतीने खाली आणून हॉटेलबाहेर जाण्यास सांगितल्यानंतर ते निघून गेले. भोसले हा बाजूच्या चायनीज दुकानात गेला. तेथून तो चॉपर घेऊन आला आणि पुन्हा हॉटेलमध्ये घुसला.

त्याला अडवण्याचा प्रयत्न करणारा हॉटेलचा भागीदार नीलेश अण्णा आणि वेटर यांच्यावर चॉपरने वार करून हॉटेलचा बोर्ड तोडला. हॉटेलमालकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत कळवले. त्यानंतर तिघेही तेथून मोटरसायकलवरून पसार झाले.

Crime News
Nashik Crime: सिडको मनपा अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटीतंर्गत गुन्हा; खासगी व्यक्ती सह, तोतया पोलिसाचा देखील समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com