ठाणे : ग्लोबल आणि कौसा कोविड रुग्णालय होणार बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

ठाणे : ग्लोबल आणि कौसा कोविड रुग्णालय होणार बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे पलिका प्रशासनाने साकेत येथे ग्लोबल आणि कौसा येथे सुरू करण्यात आलेले कोरोना रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

साकेत येथे ग्लोबल कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले. १,०७६ बेडच्या रुग्णालयात २२६ आयसीयू, ६५० ऑक्सीजनचे, १० डायलिसिसचे आणि उर्वरित बेड हे साधारण होते. त्यानुसार या रुग्णालयात आतापर्यंत तब्बल १५ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. आजवर ९४ हजार नागरिकांना कोरोना लस याच रुग्णालयात देण्यात आली. आताच्या घडीला येथे अवघ्या २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे ३५० ते ४०० च्या घरात सर्व स्टाफ असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे कौसा येथील कोविड सेंटरदेखील पहिल्या लाटेच्यावेळी सुरू करण्यात आले होते. मुंब्रा, कौसा येथील नागरिकांना नजीकच्या ठिकाणी तातडीने उपचार मिळावेत, या उद्देशाने हे कोरोना केंद्र सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी १०० आयसीयूचे बेड असे मिळून ४५० बेडचे हे रुग्णालय होते. सध्या या ठिकाणी ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: चीनमध्ये कोरोना वाढला, मॉल्स बंद, तर लॉकडाऊन आणखी कडक

सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. १ लाख ४१ हजार ३२१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील १ लाख ३८ हजार ८३७ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आजवर २,१०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर सध्या शहरात ३८० रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.२४ टक्के इतके आहे; तर रुग्णवाढीचा दर हा ३ हजार २०२ दिवसांवर पोहचला आहे. त्यातही मागील काही दिवसांत नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही २० ते ४० च्या घरात जात आहे. त्यामुळेच आता ठाणे महापालिकेने साकेत येथील ग्लोबल कोरोना केंद्र आणि कौसा येथील कोरोना केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: पुणे : दिवसभरात २४७ नवे कोरोना रुग्ण; रुग्णांच्या संख्येत वाढ

पार्किंग प्लाझा येथील कोरोना हॉस्पिटल आणि भाईंदरपाडा येथील केंद्र सुरू राहणार असल्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. तसेच ग्लोबल आणि कौसा येथी रुग्णांना पार्किंग प्लाझा येथे हलविण्यात येणार आहे.

loading image
go to top