

Thane Municipal Corporation Mayor
ESakal
ठाणे : राज्यभरात आता महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीचे रणसंग्राम सुरु झाले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून आता सर्वांचे लक्ष महापौर आणि उपमहापौर कोण होणार याकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठी अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस असणार आहे. महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने, महापौर कोण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच ठाण्याच्या सत्तेबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आता याबाबत शिंदे-फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे.