

Naresh Mhaske
ESakal
ठाणे : शहरात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात विविध मुद्द्यांवरून संघर्ष तीव्र होत असताना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा नारा दिला आहे. त्यांनी आनंद आश्रम येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेत महायुतीच्या विजयासाठी एकदिलाने काम करण्याचा आणि ठाणे महापालिकेत १०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.