Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्याला अटक, गोव्याला पळ काढताना मुसक्या आवळल्या; २ फरार

Thane Pradeep Purnekar Case: शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
Thane Pradeep Purnekar Case

Thane Pradeep Purnekar Case

ESakal

Updated on: 

ठाणे : ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. आज पहाटे निखिल यादव अणि नितेश पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. या घटनेप्रकरणी मागील तीन दिवसांत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. निखिल आणि नितेश गोवा या ठिकाणी पळ काढत असतानाच त्यांना पोलिसांनी अटक केली असून दोन जण फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com