Thane Fraud: ठाण्यात ५०० कोटींचा घोटाळा, ११ हजार जणांची फसणवणूक; मालकासह तिघे अटकेत

Investment Scam: ठाण्यात ५०० कोटी रुपयांचा हा महाघोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ११ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे.
Thane Trade with Jazz' investment company scam

Thane Trade with Jazz' investment company scam

ESakal

Updated on

ठाणे : उच्च परताव्याचे प्रलोभन दाखवून राज्यभरातील तब्बल ११ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील ‘ट्रेड विथ जॅझ’ या गुंतवणूक कंपनीच्या मालकासह तिघांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांचा हा महाघोटाळा असून, यामध्ये पोलिसांसह काही सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी अटक केल्यानंतर न्यायालयाने या तिघांना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com