esakal | कोपर पुलावर पडला पहिला खड्डा,नागरिकांनी फोटो केले व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कोपर पुलावर पडला पहिला खड्डा,नागरिकांनी फोटो केले व्हायरल ..

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - कल्याणच्या (Kalyan) पत्रिपुलानंतर बहुचर्चित पूल म्हणजे डोंबिवलीतील (Dombivali) कोपर (Kopar) पूल. दोन दिवसांपूर्वीच या पुलाचे मोठ्या दिमाखात मुख्यमंत्र्यांचा (CM) हस्ते ऑनलाईन उदघाटन पार पडले. या पुलावर पहिला खड्डा पडला असून त्याचे फोटो नागरिकांनी समाज माध्यमावर (Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच काही छोटे खड्डे व डांबरीकरणाला क्रॅक देखील पडले आहेत. उदघाटन सोहळ्यासाठी पावसाळ्यात कामाची केलेली घाई पालिका प्रशासनाच्या अंगलट आल्याची चर्चा आता सूरु झाली आहे.

डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर पूल सुरू होण्याची प्रत्येक डोंबिवलीकर आतुरतेने वाट पहात होता. मंगळवारी पुलाचे उदघाटन झाल्यानंतर वाहनचालकांनी याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पूल सुरू होऊन दोन दिवस होत नाही तेच पुलावर छोटे दोन तीन खड्डे पडले आहेत. यावरून आता गाजावाजा करीत उदघाटन करणाऱ्या पालिका प्रशासनाला ट्रोल करण्यास सामान्य नागरिकांनी सुरवात केली आहे. या खड्ड्यांचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल करीत, पुलाचे व्हिडीओ व्हायरल करीत पालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

हेही वाचा: सुविधा दिल्या तरच मालमत्ता कर भरू

वारंवार तारखा दिल्यानंतर गणपती आधी कोपर पूल सुरू करण्याचे उद्दिष्ट पालिका प्राशासनाने ठेवले होते. त्यानुसार पावसाने थोडी उसंत घेताच पुलावरील डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र पावसाची रिमझिम सुरू असल्याने हे काम किती दिवस टिकणार यावर आधीच प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर अधिकाऱ्यांनीही पावसामुळे खड्डे पडण्याची शक्यता वर्तविली होती.

दोन दिवसातच पुलावर पहिला खड्डा पडला असून इतर एक दोन छोटे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच डांबराला भेगाही गेल्या आहेत. या कामावरून आता सामान्य जनतेनेच पालिका प्रशासनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता प्रशासन इथे लक्ष देईल का हे पहावे लागेल.

loading image
go to top