

दुसऱ्यांदा जीर्णोद्धार
या मंदिराचा ११४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे पुरावे विश्वस्तांकडे आहेत. त्या वेळच्या पावत्या विश्वस्तांनी जपून ठेवल्या आहेत. पनवेलमधील उद्योजक राजू गुप्ते यांनी आपल्या मातोश्री कांता कृष्णकांत गुप्ते यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नुकताच दुसऱ्यांदा जीर्णोद्धार केल्याने सध्या मंदिराला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे.
नुकताच जीर्णोद्धार झालेले पनवेलमधील लक्ष्मी-नारायणाचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे पनवेलमधील लक्ष्मी-नारायणाचे एकमेव मंदिर असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे. पनवेलमधील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या ऐतिहासिक लक्ष्मी-नारायण मंदिराला ४०० वर्षांचा इतिहास असल्याची माहिती मंदिराच्या जुन्या विश्वस्तांकडून दिली जाते; मात्र मंदिर विश्वस्तांकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार हे मंदिर ११४ वर्षे जुने असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध आहे. शास्त्रांमध्ये लक्ष्मी-नारायणाच्या ज्या ज्या विधी आहेत, त्याची वेगळी शास्त्रे असून पूजाअर्चा नेमकी कशा पद्धतीने करायची, याबाबत वेगळी माहिती आहे.
दर वर्षी श्रावण महिन्यात या मंदिरात मोठ्या उत्साहात कृष्ण-जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. या वेळी मंदिरात बाळकृष्णाची मूर्ती, जिला गोकुळ म्हटले जाते ती पाळण्यात घालून यथासांग पूजा करून कृष्णजन्म साजरा केला जातो. मंदिरात चाद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या गणेश-उत्सवाला पावणेदोनशे वर्षे झाल्याचे सांगतात. महिला मंडळाच्या वतीने रामजन्मोत्सवदेखील मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भाविक या वेळी गर्दी करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.